Sambar Deer
Sambar Deersakal

Sambar Deer : कुत्र्यांच्या तावडीतून सांबराला वाचविले; प्राणीमित्र गावडेंची तत्परता

हिरण्यकेशी नदीपात्रात सांबराच्या पिल्लावर कुत्र्यांनी हल्ला केला; मात्र येथील प्राणीमित्र प्रथमेश गावडे यांच्या प्रसंगावधानामुळे या पिल्लास जीवदान मिळाले.
Published on

आंबोली - येथील फौजदारवाडी परिसरातील हिरण्यकेशी नदीपात्रात सांबराच्या पिल्लावर कुत्र्यांनी हल्ला केला; मात्र येथील प्राणीमित्र प्रथमेश गावडे यांच्या प्रसंगावधानामुळे या पिल्लास जीवदान मिळाले. या पिल्लाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत माहिती अशी, की फौजदारवाडी येथे हिरण्यकेशी नदीपात्रानजीक आज सकाळी एका सांबराच्या पिल्लाला कुत्र्यांच्या झुंडीने घेरले. जीव वाचविण्यासाठी ते पिल्लू धडपडत होते. यावेळी तेथूनच रिक्षा घेऊन जाणारे येथील ‘रानमाणूस’ प्रथमेश गावडे यांच्या लक्षात येताच त्यांनी पिल्लाला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांच्यासोबत शैलेश गावडे आणि राकेश अमृसकर यांनीही प्रथमेश यांनीही मदत केली.

या तिघांनी कुत्र्यांच्या हल्ल्यातून सांबराच्या पिल्लाला वाचविले. त्यानंतर आंबोली वन विभागाला माहिती देण्यात आली. कुत्र्यांच्या झुंडीत सापडल्याने पिल्लू भयभीत झाले होते. वनरक्षक गाडेकर व बाळा गावडे यांनी त्या पिल्लाला येथील वन कार्यालयात नेले.

तेथे पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकरवी त्याच्यावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. हे पिल्लू साधारण अंदाजे वर्षभराचे आहे. आईपासून दुरावलेले हे पिल्ले भरकटलेल्याने वाट चुकले आणि कुत्र्यांच्या तावडीत सापडले. कुत्र्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले; मात्र त्याचवेळी तेथे पोहोचलेले प्रथमेश गावडे यांच्यामुळे पिल्लास जीवदान मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.