मांडकीत सोमवारी गावठी बैल नांगरणी स्पर्धा

मांडकीत सोमवारी गावठी बैल नांगरणी स्पर्धा

Published on

मांडकीत सोमवारी
बैल नांगरणी स्पर्धा
चिपळूणः मांडकी येथील श्री नेटकेश्वर ट्रस्टच्यावतीने खांबेवाडी येथे १४ ऑगस्टला सकाळी ९ वाजता गावठी बैल नांगरणी स्पर्धा आयोजित केली आहे. या वेळी आमदार शेखर निकम, उद्योजक सचिन पाकळे, केतन पवार, बाळकृष्ण जाधव उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १२ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ९ हजार रुपये, तृतीय क्रमांक ६ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ३ हजार रुपये, पाचव्या क्रमांकास २ हजार रुपये व प्रत्येकी आकर्षक चषक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संदीप खांबे, वसंत खांबे, जयवंत खांबे, अमोल खांबे, राकेश घाणेकर, शंकर लोंढे यांच्याकडे संपर्क साधावा.
--------------
चिपळुणात २० ला
गुणवंतांचा सत्कार
चिपळूणः रोहिदास समाजसेवा संघाच्या वतीने २० ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता शहरातील मार्कंडी येथील रोहिदास भवन येथे गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या संघटनेची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभाही या वेळी होणार आहे. यामध्ये २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदविका, पदवी व पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर, सरचिटणीस प्रकाश पेढांबकर यांनी कळवले आहे.
-------
वैश्य समाजातर्फे
विद्यार्थींचा गौरव
चिपळूणः येथील वैश्य समाजसंस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये १० वी आणि १२ वीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या तसेच विविध शाखांतील पदवीधर असणाऱ्या वैश्य समाजाशी निगडित शहरातील विद्यार्थ्यांचा सन्मान १३ ऑगस्टला सकाळी १० वाजता संस्थेच्या राधाताई लाड सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये १० वीमध्ये किमान ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण व १२ वीमध्ये किमान ७० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र, विधी व न्याय आदी क्षेत्रातील पदवीधरांचा गौरव केला जाणार आहे. दिलेल्या निकषाप्रमाणे पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेतील गुणपत्रकाची छायांकित प्रत मागील बाजूस मोबाईल क्रमांकाची नोंद करून संस्थेच्या राधाताई लाड सभागृह येथे ११ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवस्थापक खेडेकर यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन अध्यक्ष पंकज कोळवणकर व सचिव अमोल टाकळे यांनी संस्थेमार्फत केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()