निसर्ग सफाई कामगार गिधाडांचे देव्हारेत दर्शन

निसर्ग सफाई कामगार गिधाडांचे देव्हारेत दर्शन

Published on

Rat३०p३१.jpg
२६९२३
देव्हारेः उंच झाडांवर निवांत बसलेले गिधाडे. (सचिन माळीः सकाळ छायाचित्रसेवा)

दुर्मिळ गिधाडांचे देव्हारेत दर्शन
पर्यावरणप्रेमी आनंदी; दोन जनावरांच्या मृत्यूनंतर आगमन
सचिन माळी/सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३०ः निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाड पक्षाचे अनेक वर्षांपासून दर्शन दुर्मिळ झाले आहे. एकेकाळी जनावर मृत्युमुखी पडले की, गावाच्या आकाशात गिधाडे घिरट्या घालायची, पंरतु गिधाड आज नामशेष झाले आहे. मात्र देव्हारे येथे अनपेक्षित गिधाडांचे दर्शन झाल्याने पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला. जवळपास ३० ते ४० गिधाडे या ठिकाणी दिसून येत आहेत.
देव्हारे येथील महादेव मंदिर परिसरात २८ ऑगस्टला सकाळी तुटलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून दोन जनावरांचा मृत्यू झाला. त्यांना त्याच परिसरात सुरक्षित जागी ठेवण्यात आले. मृत जनावरांचे मांस खाणाऱ्या गिधाड या पक्ष्यांना नैसर्गिक खबर लागल्याने त्याच दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास या परिसरात गिधाडांच्या घिरट्या होऊ लागल्या. अनेक वर्षे दृष्टीस न पडणारी गिधाडे अचानक अनपेक्षित दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बोरखत आणि शिपोळे गावी यांचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर देव्हारे येथे मोठ्या संख्येने गिधाडे उतरली आहेत. त्यांनी मंदिर परिसरातील रहाटीत उंच वाढलेल्या जुन्या वृक्षांचा आधार घेतला आहे.
गिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींचे कार्य एकच म्हणजे मृतदेहांचा फडशा. हे असले तरी या सर्व जाती एकमेकांच्या साह्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात व साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेवून विहार करणे पसंत करतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. या गिधाडांमधील एक इजिप्शियन गिधाड नावाची जात आहे. या जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरू शकतात. बहुतेक गिधाडांची याच गिधाडावर नजर असते. जेव्हा हे गिधाड खाद्य हेरते तेव्हा ते साहजिकच खाद्य जिथे असेल तिथे उतरते. त्याला उतरताना पाहून इतर गिधाडे पण उतरू लागतात व सगळ्या गिधाडांना खबर मिळते की, खाद्य मिळाले आहे.

चौकट
राज गिधाड येण्याची वाट
खाद्यापाशी पोहोचल्यावर गिधाडे बराच वेळ राज गिधाड येण्याची वाट बघत असतात. मृतदेहांची कातडी बहुधा अत्यंत जाड झालेली असते व बहुतांशी गिधाडांना ती भेदणे आवाक्याबाहेरचे असते. राज गिधाडाने येऊन पहिले काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचे काम चालू होते व पाहता पाहता पूर्ण मृतदेहाचा अक्षरक्षः फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.