गोठोस येथील महिलांना मसाले बनविण्याचे धडे
28317
गोठोस ः येथे मसाले बनविणे प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना प्रथमेश सावंत.
गोठोस येथील महिलांना
मसाले बनविण्याचे प्रशिक्षण
बांदा ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रुप ग्रामपंचायत, गोठोस यांच्या संयुक्त विद्यमाने गोठोस येथे महिलांसाठी तीन दिवसीय मसाले बनविणे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सूरज कदम यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ग्रामसेवक श्रद्धा आडेलकर, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, प्रशिक्षक प्राची धुरी, ग्रामसंघ अध्यक्ष नेवगी, दीपाली गावडे, तन्वी नाईक, रुबिना डिसोजा, संजना लाड, सुचिता लाड, नेहा गवंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणात ४२ महिलांनी सहभाग घेतला. कोकण संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्रथमेश सावंत यांनी करून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय सुरू करावा व महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत हे प्रशिक्षण आयोजित केल्याचे सरपंच कदम यांनी सांगितले. मांडले व प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामसेवक सौ. श्रद्धा आडेलकर यांनी कोकण संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कोकण संस्थेचे समन्वयक समीर शिर्के यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.