मुले मोबाईलवर काय करतात, ते वेळीच लक्ष द्या

मुले मोबाईलवर काय करतात, ते वेळीच लक्ष द्या

Published on

२२ (पान २ साठी)


- rat१३p१२.jpg-
P२३M३०२३५
चिपळूण ः पोफळी-सय्यदवाडी येथे यासीन दळवी यांचे स्वागत करताना मैनुद्दीन सय्यद. शेजारी अब्बास सय्यद, शमसुद्दीन सय्यद, नाझीम अफवारे, मुराद अडरेकर आदी.
--------
मुलांच्या मोबाईलवर लक्ष ठेवा

यासिन दळवी ; चिपळूण मुस्लिम समाजसंस्थेतर्फे व्याख्यान

चिपळूण, ता. १३ : कोरोना काळात गरजेपोटी दिलेला मोबाईल आता मुलांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल देताना तुमची मुले मोबाईलवर काय पाहतात याकडे लक्ष द्या, असे आवाहन चिपळूण मुस्लिम समाजसंस्थेचे उपकार्याध्यक्ष यासिन दळवी यांनी केले.
पोफळी-सय्यदवाडी येथील बाबा ग्रुपतर्फे शालेय मुले आणि त्यांच्या पालकांसाठी मोबाईलचे फायदे-तोटे या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी दळवी म्हणाले, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण मोबाईलच्या आहारी गेलेले पाहायला मिळतो. त्यामुळे मुलांमध्ये आता चिडचिडेपणा, सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहाणे, गेम्स खेळत बसणे असे अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल देताना ते काय पाहतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत शिक्षकांनी व पालकांनी योग्य मार्गदर्शन केले तर भावी पिढी विकृतीकडे जाणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.