चिपळूण-जैवविविधतेसाठी सती विद्यालयाचा पुढाकार

चिपळूण-जैवविविधतेसाठी सती विद्यालयाचा पुढाकार

Published on

-rat२२p१८.jpg -3M32815 चिपळूण ः चिंचघरी रस्त्यांच्या दुतर्फा जंगली बियांचे रोपन करताना सती विद्यालयाचे विद्यार्थी.
-----------

जैवविविधतेसाठी सती विद्यालयाचा पुढाकार

८० विद्यार्थ्यांचा सहभाग ; चिंचघरी रस्त्याच्या दुतर्फा टाकल्या बिया
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विज्ञान पर्यावरण विभाग व हरित सेना विभागाने जैवविविधतेसाठी पुढाकार घेतला आहे. विज्ञान शिक्षक शिवाजी पाटील यांनी मुख्याध्यापक संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठवीतील ८० विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी व जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी विविध जंगली झाडाच्या बिया जमा करण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार जमवलेल्या बिया चिंचघरी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी चिंच, हिरडा, बेहडा, जांभूळ, खैर, फणस, काजू, करवंद अशा अनेक जंगली झाडांच्या बिया जमा केल्या. जून, जुलै, ऑगस्ट, महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आला नाही. मात्र योग्य पर्यावरणाचा अभ्यास करून नुकतेच चिंचघरी रस्त्याच्या दुतर्फा, तसेच परिसरातील मोकळ्या जागेमध्ये जंगली झाडांच्या बियांचे रोपण शास्त्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांनी केले. जमिनीच्या पृष्ठभागापासून दोन ते तीन सेंटीमीटरच्या खोलीमध्ये व्यवस्थितरित्या बीजरोपण करण्यात आले. बिजांकुरणासाठी हे वातावरण आल्हादायक व रोप वाढीसाठी प्रतिकूल असते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने पर्यावरण संवर्धनासाठी व जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी सहभाग घेतला होता. ८० विद्यार्थ्यांनी बिजांचे रोपण केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक पांडुरंग काळुगडे, स्मिता चाळके, राजश्री सावंत व शिवाजी पाटील उपस्थित होते. या उपक्रमाचे आमदार शेखर निकम, मुख्याध्यापक संजय वरेकर यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()