कुणकेश्वर मंदिर विकासासाठी लवकरच ७५ कोटींचा निधी
कुणकेश्वर मंदिर विकासासाठी
लवकरच ७५ कोटींचा निधी
आमदार नितेश राणे यांची माहिती
कणकवली,ता. २७ ः देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी कुणकेश्वर मंदिर पर्यटन विकासासाठी प्राप्त होणार आहे. महाकालेश्वर मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर कोकणची काशी कुणकेश्वर मंदिराचा पर्यटन विकास होणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देताना दिली.
याबाबत दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे, की सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी धोरणात्मक पावले उचलत आहोत. पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात देशातील पहिले कंटेनर थिएटर देवगडमध्ये उभारले आणि ते सुस्थितीत सुरू आहे. पर्यटकांसाठी तळकोकणात पहिले वॅक्स म्युझियम देवगडमध्ये सुरू केले आहे. देशातील दुसरे महाराणा प्रताप कलादालन वैभववाडीत बनवले आहे. पोद्दार स्कूल कणकवली मध्ये सुरू केले आहे. पर्यटनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी मोठे मोठे प्रकल्प पर्यटनच्या माध्यमातून आणणार आहे, असेही आमदार श्री. राणे यांनी पत्रकातून नमुद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.