शीळच्या विद्युत पंपांना आज रात्री स्टार्टर

शीळच्या विद्युत पंपांना आज रात्री स्टार्टर

Published on

२५ (पान ३ साठी)

रत्नागिरी शहराला आजपासून नियमित पाणी

विद्युतपंप कार्यान्वित ; १० दिवस नागरिकांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : शीळ नदीवरील फ्लोटिंग पंप आणि जॅकवेलमधील २५० अश्वशक्तीच्या २ मोठ्या विद्युतपंपाचे वायरिंग सायंकाळी पूर्ण झाले आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून शहराला नियमित पाणीपुरवठा होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तसे झाले तर तब्बल दहा दिवसांनी शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी सर्वांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पाणीयोजनेतील नवीन १० लाख लिटरच्या जॅकवेलमध्ये पाणी उडवले जाणार आहे. त्यासाठी फ्लोटिंगचे ४ पंप जोडण्याचे काम दोन दिवस झाले सुरू आहे. पाइप जोडून झाले असून अंतिम टप्प्यातील वायरिंग रात्री पूर्ण होईल. मुख्य जलवाहिनीच्या पंपांचेही वायरिंग होत आले आहे. त्यामुळे शीळ जॅकवेलवर बसवण्यात आलेल्या एकूण ६ पंप कार्यान्वित होतील. सुरवातीला ४ पंपांद्वारे नदीतील पाणी जॅकवेलमध्ये आणले जाईल. ही टाकी भरल्यानंतर पहाटे मुख्य २ पंप सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे शहराचा रविवारी नियमित पाणीपुरवठा होईल. याबाबत पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर म्हणाले, आम्ही गेले दहा दिवस शीळ येथील साईटवरच आहोत. शहरवासीयांची पाण्याची गैरसोय दूर करून त्यांचा त्रास कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला आता यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.