नारायणी रावराणेची नवोदयसाठी निवड
swt57.jpg
35901
वरवडेः नारायणी रावराणे हिचा गौरव करताना शीतल पाटील. सोबत वडील गणेश रावराणे.
नारायणी रावराणेची नवोदयसाठी निवड
तळेरे : आयडियल इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स, वरवडे विद्यालयाची विद्यार्थिनी नारायणी रावराणे हिची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी, इंग्रजी माध्यम) जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. नारायणी ही नवोदय विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम प्रवेश परीक्षेत दुसऱ्या निवड यादीमधून प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे तळेरे पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिला शीतल पाटील, आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडेचे शिक्षक आणि आईवडिलांचे मार्गदर्शन लाभले.
................
swt58.jpg
35902
कणकवलीः गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचा सत्कार करताना सरपंच प्राची ईसवलकर. सोबत उपसरपंच महेंद्र गुरव व अन्य. (छायाचित्रः एन. पावसकर)
गटविकास अधिकारी चव्हाण यांचा सत्कार
तळेरे : कणकवली पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना कणकवली गटविकास अधिकारीपदी (उच्च स्तर वर्ग-१) बढती मिळाली. याबद्दल खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने काल (ता. ४) पंचायत समिती कार्यालयात त्यांची सदिच्छा भेट घेऊन सरपंच प्राची ईसवलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, किरण कर्ले, मनाली होनाळे, ग्रामविकास अधिकारी जी. सी. आदी उपस्थित होते. खारेपाटण हे कणकवली तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून, जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या या गावाच्या विकासासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी दिले.
....................
swt59.jpg
35903
कुडाळः राकेश परब यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
राकेश परब यांना ‘विद्यार्थीमित्र’ पुरस्कार
बांदाः नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली २३ वर्षे देत असलेल्या योगदानाबद्दल येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूलमधील मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाचे तंत्रशिक्षक राकेश परब यांना ''विद्यार्थीमित्र'' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नुकताच कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात परब यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले. व्यासपीठावर सहदेव धर्णे, अमित केरवडेकर, जोवेल डिसिल्वा, बापू परब, संजय पिळणकर आदी उपस्थित होते. यापूर्वी परब यांना ''पर्यावरणमित्र'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शैक्षणिक, सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच योगदान दिले आहे.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.