सीए इन्स्टिट्यूटतर्फे युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम

सीए इन्स्टिट्यूटतर्फे युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम

Published on

१५ (पान २ साठी)

सीए इन्स्टिट्यूटतर्फे युनायटेड मार्गदर्शन

चिपळूण, ता. १३ : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेतर्फे पूर्ण भारतात मेगा करिअर काउन्सेलिंग मीट आणि करिअर इन अकाउंट्स अँड फायनान्स फॉर युथ असे दोन उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत आयसीएआयच्या रत्नागिरी शाखेच्या चिपळूणमधील सदस्यांनी युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन केले.
चिपळूण येथील नामवंत सीए सुमेध करमरकर, सीए जुली ओसवाल, सीए अमित ओक, सीए प्रियांका जोगळेकर यांनी यात मार्गदर्शन केले. युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि शिक्षक सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सीए जुली ओसवाल यांनी करिअरबद्दल दहावीपासूनच जागरूकतेचे महत्व, सीए या व्यवसायाची विश्वभरात असणारी व्याप्ती, सीए या करिअरची प्राथमिक स्वरूपातील माहिती दिली. सीए प्रियांका जोगळेकर यांनी पीपीटीचा वापर करून सीए या करिअरची विस्तृत स्वरूपात माहिती दिली. सीए सुमेध करमरकर यांनी सीए करिअरसाठी लागणारे परिश्रम आणि त्यातून निखरणारे व्यक्तिमत्व आणि पुढे उभा राहणारे उत्कृष्ट करियर याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सीए अमित ओक यांनी शाळेने करिअर मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेल्या संधीसाठी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.