अमृत कलश यात्रेस दोडामार्गमध्ये प्रतिसाद

अमृत कलश यात्रेस दोडामार्गमध्ये प्रतिसाद

Published on

37549
दोडामार्ग ः मातीचा कलश मनीष सावंत व विराज वेटे यांच्याकडे सुपूर्द करताना तहसीलदार संकेत यमगर, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ आदी. (छायाचित्र ः संदेश देसाई)

अमृत कलश यात्रेस दोडामार्गमध्ये प्रतिसाद

विद्यार्थी, नागरिकांचा सहभाग ः विविध घोषणांनी परिसर दणाणला

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १२ : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ''मेरी मिठ्ठी मेरा देश'' अमृत कलश यात्रा आज दोडामार्ग पंचायत समिती कार्यालयाकडून देशाप्रती विविध घोषणा देत काढण्यात आली. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. दोडामार्ग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एम.सी.सी. परेड करत कलशाला सलामी दिली. तहसीलदार कार्यालय येथे यात्रेचे तहसीलदार संकेत यमगर यांनी स्वागत केले.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सहायक गटविकास अधिकारी नीलेश जाधव, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजेंद्र म्हापसेकर, गटशिक्षण अधिकारी निसार नदाफ, नेहरू युवा लोकसेवा केंद्र तालुकाध्यक्ष सुहास देसाई, चंदू मळीक, शंकर देसाई, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी मनीष सावंत, विराज वेटे आदींसह सरपंच अजित देसाई, झोळंबे सरपंच विशाखा नाईक व ग्रामसेवक उपस्थित होते. तालुक्यातील सर्व गावांतील माती ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे देण्यात आली. ती माती एकत्रित करून अमृत कलशात घालून अमृत कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली. तहसीलदार यांनी पंचायत समितीच्या वतीने नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी मनीष सावंत व विराज वेटे यांच्याकडे सुपूर्द केली. राज्याकडून ती दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे. दोडामार्ग गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत रॅली काढून दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपास्थितीत कलश देण्यात आला. दिल्ली येथे या मातीचा वापर शूरवीरांच्या स्मरणार्थ अमृत वाटिकेच्या निर्मितीमध्ये केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.