‘इंडिया आघाडी’चा प्रतिसाद धडकी भरवणारा

‘इंडिया आघाडी’चा प्रतिसाद धडकी भरवणारा
Published on

37812
सावंतवाडी ः येथे मेळाव्यात बोलताना बाळासाहेब पाटील. व्यासपीठावर अमित सामंत, प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब आदी.

ॊ‘इंडिया आघाडी’चा प्रतिसाद धडकी भरवणारा

बाळासाहेब पाटील ः सावंतवाडीत मेळावा, अर्चना घारे-परबांना निश्चितच न्याय देणार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः इंडिया आघाडीला मिळणारा प्रतिसाद मोदी शासनाला धडकी भरवणारा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या झेंडय़ाखाली सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज येथे केले. सावंतवाडी मतदार संघात राष्ट्रवादीचे काम अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली जोमाने सुरू आहे. त्यांच्याकडे अभ्यासू नेतृत्व आहे. पक्ष वाढविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नात आहेत. माझ्या निरीक्षणाचा अहवाल मी वरिष्ठांना सादर करणार आहे. त्यामुळे त्यांना पक्ष निश्चितच न्याय देणार, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
येथील रविंद्र मंगल कार्यालयात आज राष्ट्रवादीचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, जिल्हा निरिक्षक शेखर माने, व्हिक्टर डॉन्टस, प्रसाद रेगे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अनंत पिळणकर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक घारे, नम्रता कुबल, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बाबा खतीब, सचिन पाटकर आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘आमचे सरकार हेच खरे जनतेच्या मनातील सरकार होते. पण, दुर्दैवाने भाजप कूटनीतीने सत्तेत आले. आमच्या पक्षाने पुरोगामी विचार कधीच सोडला नाही. सत्तेत असलेल्या सरकारने जाणीवपूर्वक निवडणूका पुढे पुढे ढकलल्या आहेत. आताचे सत्ताधारी फक्त राजकारण आणि प्रसिद्धी पलीकडे काहीच करीत नाही. आगामी काळात आपण सावध राहणे गरजेचे आहे. घारे-परब या अभ्यासू नेतृत्व आहेत. पक्ष वाढविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांना पक्ष निश्चित न्याय देणार.’’
जिल्हाध्यक्ष सामंत म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत काम करताना जिल्ह्यात तिन्ही मतदार संघात प्रत्येक निवडणुकीत शिवसेना जास्त जागा मागत आली आहे. मात्र, आम्ही काय फक्त झेंडे लावायचे आणि चाकरीच करायची. सावंतवाडी विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळाली पाहीजे आणि उमेदवार अर्चना घारेच असतील. विनायक राऊत यांना पुन्हा खासदार व्हायचे असेल तर त्यांनी आघाडीत समान तिकीट दिलीच पाहीजेत.’’
माजी राज्यमंत्री भोसले म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यास अर्चना घारे-परब यांच्यासाठी जोमाने काम करु. इथले आमदार केसरकर निष्क्रिय आणि प्रत्येक कामाच्या बाबतीत अडवणूक करणारे आहेत. त्यामुळेच येथील मतदारसंघात नागरिकांना हवे असलेले परिवर्तन आम्ही घारेंच्या माध्यमातून करु.’’
घारे-परब म्हणाले, ‘‘लाभाचे पद नसताना सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी वाढविण्याचे आम्ही काम करत आहे. येणाऱ्या काळात चौवीस तास काम करुन अजून राष्ट्रवादी वाढविण्याची तयारी ठेऊ. फक्त वरिष्ठांनी पाठबळ आणि आशीर्वाद द्यावा.’’ या मेळाव्यात जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस, रूपेश जाधव, विशाल जाधव, बाळ कनयाळकर, योगेश कुबल यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे हिदायतुल्ला खान, अफरोज राजगुरु, देवा टेमकर, राकेश नेवगी, बाबल्या दुभाषी, जावेद शेख, पुजा दळवी आदी उपस्थित होते. प्रसाद रेगे यांनी प्रास्तविक केले. राजा सामंत यांनी सूत्रसंचालन तर पुंडलिक दळवी यांनी आभार मानले. मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
-------------------
चौकट
सावंतवाडी मतदारसंघात समस्या ः माने
श्री. माने म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील संघटनेचे काम चांगल्या पध्दतीने सुरु आहे. जे लोक संघटनेसाठी काम करत नव्हते, तेच आज बाहेर गेले आहेत. शरद पवार यांच्या विचारांवरच चालणारा हा जिल्हा आहे. सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या समस्या आहेत. निधी, जागा असताना येथील मल्टीस्पेशालाटी केवळ स्थानिक आमदाराच्या हट्टापोटी अडलेले आहे. राष्ट्रवादीचा आमदार असताना येथे विकास झाला. त्यांनतर काहीच झाले नाही. त्यामुळे या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रवादीला साथ द्यावी.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.