मोफत धान्य पुरवठ्यापेक्षा गॅस, विजेचे दर कमी करा

मोफत धान्य पुरवठ्यापेक्षा गॅस, विजेचे दर कमी करा

Published on

मोफत धान्य पुरवठ्यापेक्षा
गॅस, विजेचे दर कमी करा
गुरुनाथ गावकरः प्रशासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३०ः केंद्राने धान्य मोफत देण्यापेक्षा गॅस सिलिंडर व घरगुती विज बिलांचे दर कमी करून ते पाच वर्षांसाठी स्थिर ठेवावेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क कमी करून गरीब कुटुंबातील एका तरी व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, केंद्राने कोविड महामारीच्या काळात गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. ही योजना केंद्राने पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यापेक्षा नागरिकांना रोजगार दया. घरकुल योजनेत ती लाखांपेक्षा जास्त मदत द्यावी. गरीब कुटुंबातील किती जणांना योजनांचा लाभ मिळाला, याचा सर्व्हे होणे गरजेचे आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात प्रत्येक लाभार्थ्यास पाच किलो मोफत धान्य दिल्यास शेती कोणच करणार नाही आणि मजूरही मिळणार नाहीत. त्यापेक्षा मोफत गॅस सिलिंडर, कमी दरात वीज देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा. प्रत्येक जिल्ह्यात ''एमआयडीसी''च्या माध्यमातून उद्योग धंदे आणा. योजना सुरू ठेवण्याचा निर्णय स्वार्गतार्ह आहे; मात्र गरीब कोण व श्रीमंत कोण, याचा सर्व्हे होणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.