डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर क्रांतिकारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर क्रांतिकारक

Published on

49650
वेंगुर्ले ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी लखमराजे भोसले, प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर क्रांतिकारक

लखमराजे भोसले ः वेंगुर्लेत भाजपतर्फे महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीभेद, लिंगभेद आणि वर्गभेद याविरुद्ध लढा देणारे समाज क्रांतिकारक आणि वंचितांच्या कल्याणाचा वसा घेतलेले राजकारणी म्हणून जगभर लौकिक आहे. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते एक निष्णात अर्थतज्ज्ञ होते, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजप वेंगुर्ले तालुका कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले व जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. भाजपच्या वतीने २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘संविधान गौरव पंधरवडा’ आयोजित करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर यांनी, मोदी सरकारने संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी करत डॉ. बासाहेबांबद्दल असलेला आदर द्विगुणित केला, असे सांगितले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णू उर्फ पपू परब, नगरसेविका श्रेया मयेकर, शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे व नीलेश मांजरेकर, तालुका चिटणीस जयंत मोंडकर, युवा मोर्चाचे हेमंत गावडे, कृष्णाजी सावंत, मारुती दोडशानट्टी, तन्मय जोशी, महिला मोर्चाच्या कार्तिकी पवार व स्वरा देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर होडावडेकर, महेश धुरी, प्रशांत धुरी, सुनील मठकर, सुरेश धुरी आदी उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.