बौद्धिक विकासासाठी बाल साहित्य वाचन व्हावे

बौद्धिक विकासासाठी बाल साहित्य वाचन व्हावे

Published on

kan141.jpg
M51120
ओसरगावः येथील एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अजय कांडर यांचा सत्कार करताना किशोर कदम, बाजूला प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर, किशोर गवस आणि कल्पना बांदेकर.

बौद्धिक विकासासाठी बाल साहित्य वाचन व्हावे
अजय कांडरः ओसरगाव येथे एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलन
कणकवली, ता. १४ः शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास झाला तर तो पुणे सुजाण नागरिक होऊ शकतो. त्‍यामुळे बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले.
ओसरगाव येथील शाळा क्रं.१ मध्ये बालकुमार साहित्‍य संमेलन झाले. यात अध्यक्षस्थानावरून कवी अजय कांडर बोलत होते. राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नंबर १ यांच्यावतीने हा कार्यक्रम झाला. या संमेलनाचे उद्घघाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर यांनी केले. यावेळी मंचावर तालुका गटशिक्षण अधिकारी किशोर गवस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मुख्याध्यापक किशोर कदम, रंगकर्मी कल्पना बांदेकर, राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब, ओसरगाव सरपंच सुप्रिया कदम, निपुण भारतचे प्रमोद तांबे, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जिवबा अपराज, बोर्डवे सरपंच वेदांगी पाताडे आदी उपस्थित होते.
प्राचार्य शिवलकर म्हणाले, लहानपणीच मुलांमधे प्रत्येक गोष्टीचे कुतूहल जागृत होत असते. त्यातून त्यांना विविध प्रश्न पडत असतात. विविध कला याच वयात त्यांना खुणावत असतात. अशावेळी अशी साहित्य कला संमेलने फार उपयुक्त असतात. या संमेलनातून मुलांना शिक्षणाच्या पलीकडे खूप मोठे कला जग असते याची जाणीव होईल. आणि भविष्यात त्यांच्या कलागुणांमध्ये मोठी वाढ होईल.
किशोर कदम म्हणाले, शिक्षणापलीकडे ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न सतत असतो. त्‍याअनुषंगाने प्रथमच आम्‍हाला इथ बालकुमार साहित्‍य संमेलन यशस्वीपणे आयोजित करता आले. यावेळी किशोर गवस, विवेक परब यांनी विचार व्यक्त केले. मुक्ता साळवे विचार मंचावर संपन्न झालेल्या या संमेलनात प्रसिद्ध निवेदक राजेश कदम यांनी कविता अशीच स्फुरते या विषयावर विचार व्यक्त केले. खजिना कथांचा..आविष्कार कथाभिनयाचा या विषयावर कथालेखिका, सिने अभिनेत्री कल्पना बांदेकर यांनी मार्गदर्शन केले. किमया रंग-रेषांची..गट्टी चित्रकलेशी या विषयावर प्रवीण चिंदरकर यांनी मार्गदर्शन केले.नृत्य मार्गदर्शन सुदिन तांबे यांनी केले. पोलीस पाटील सौ. आंगणे, गोरेश शिरोडकर, बबली राणे, जगन्नाथ राणे, नामदेव राणे, संदेश नाईक, सुदर्शन नाईक, संजय जाधव, प्रकाश चौकेकर, किशोर तांबे, बाळकृष्ण आलव, दिगंबर आलव, मनोज चौकेकर सुमन चौकेकर, सुप्रिया अपराध, जान्हवी अपराध, रसिका तांबे, सिध्दि कदम, पल्लवी डुकरे, सायली मोहीते, अपेक्षा चव्हाण,अक्षता राणे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शैलेश तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षिका प्रमिता तांबे, शीतल दळवी,श्रीमती जाधव यांनीही परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सुरुवात इशिका तांबे व आलिया तांबे यांच्या नृत्याने करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.