मडुरा नाबर प्रशालेत पालक क्रीडा महोत्सव
53044
मडुरा ः पालक क्रीडा महोत्सवाचे क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करताना मनाली देसाई. शेजारी इतर.
मडुरा नाबर प्रशालेत पालक क्रीडा महोत्सव
बांदा ः श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मडुरा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत पालक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बांदा नाबर प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, चेअरमन ऑफ लोकल कमिटी भिकाजी धुरी, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा सानिका गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी प्रमुख पाहुणे व सर्व समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका साळगावकर यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. त्याचबरोबर खेळांचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. मनाली देसाई यांनी खेळाचे महत्त्व पटवून दिले. भिकाजी धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेच्या सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, तेजस्वी गावडे व प्राची परब आदी उपस्थित होते.
....................
53043
डिंगणे ः श्री देवी सातेरी माऊली.
डिंगणे सातेरी माऊलीचा जत्रोत्सव शुक्रवारी
बांदा ः डिंगणे येथील श्री देवी सातेरी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव २९ डिसेंबरला होत आहे. यानिमित्त सकाळपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री देवीची पालखी मिरवणूक, त्यानंतर नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डिंगणे ग्रामस्थ व मानकऱ्यांनी केले आहे.
---
बांद्यात भाजपतर्फे उद्या चित्रकला, रंगभरण स्पर्धा
बांदा ः भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे बांदा शहर भाजपच्या वतीने येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे सोमवारी (ता. २५) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी गटवार रंगभरण व आठवी ते दहावी या गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कागद पुरवला जाईल. विद्यार्थ्यांनी रंगसाहित्य सोबत आणावयाचे आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार असून, या दिवशी नाताळ सणाच्या निमित्ताने सांताक्लॉजकडून मुलांना खाऊचे वाटपही करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन बांदा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.