Article by Dr. Srigurudas Dandekar on Lifestyle and Health
Article by Dr. Srigurudas Dandekar on Lifestyle and Healthesakal

Health Tips : आव्हानात्मक जीवनशैली आणि आरोग्य - एक कसरत

आजचं जगण धकाधकीचं आहे. प्रचंड स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई आहे.
Published on
Summary

आयुष्याच्या शर्यतीत धावताना ‘शक्य तेवढं’ आरोग्यपूर्णही राहावं यासाठी काय करता येईल, याबद्दल विविध तज्ज्ञ डॉक्टर या सदरातून शास्त्रशुद्ध माहिती देणार आहेत.

-डॉ. श्रीगुरूदास दांडेकर (spdandekar@gmail.com)

आजचं जगण धकाधकीचं आहे. प्रचंड स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई आहे. कमी वेळेत खूप काही करून दाखवायचं आहे. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं आहे. या प्रकारचं आयुष्य जगणं ही काळाची गरज आहे.

असं असताना, आरोग्य (Health) टिकवण्याचे सर्वसामान्य नियम म्हणजे ‘लवकर झोपणे’, ‘पुरेशी झोप’, ‘लवकर उठणे’, ‘ठराविक वेळेत नियमित व्यायाम’ (Exercise), ‘सकस घरी बनवलेला समतोल आहार’, ‘बाहेरील पदार्थ न खाणे’, ‘अवेळी न खाणे’, ‘व्यसन न करणे’, ‘कामाचा ताण कमी करणे’, हे पाळण शक्य आहे का? याचं सर्वसामन्य उत्तर नाही हेच येईल; पण आयुष्याच्या शर्यतीत धावताना ‘शक्य तेवढं’ आरोग्यपूर्णही राहावं यासाठी काय करता येईल, याबद्दल विविध तज्ज्ञ डॉक्टर या सदरातून शास्त्रशुद्ध माहिती देणार आहेत. (Article by Dr. Srigurudas Dandekar on Lifestyle and Health)

Article by Dr. Srigurudas Dandekar on Lifestyle and Health
आरोग्य क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी : प्रा. शिर्के

चिरायु’ व्हायला कोणाला आवडणार नाही! मनुष्यप्राणी भविष्यात चिरायु होऊही शकेल; पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे आत्ता जगत असलेलं आयुष्य उत्तम पद्धतीने जगणं, आपली ध्येये साकार करणं, स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजाला समृद्ध करणं. या सर्व गोष्टी करतानादेखील निरोगी राहावं. खरंतर, आयुष्य समरसून जगायचं असेल तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य आवश्यक असते. त्यासाठी काय करता येईल पाहुया.

कामाच्या वेळा अनियमित आहेत, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि तुम्हाला झेपेल/शक्य होईल, असा व्यायाम करा. कोणता व्यायाम तुमच्या शरीररचनेला साजेसा आहे, या संबंधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यायामाचा तपशील ठेवणारी बरीच अॅप उपलब्ध आहेत त्यांचा वापर करा जेणेकरून अनियमिततेमध्येही नियमितता येईल. खाण्याच्या वेळा अनियमित असतील तरी जे खाल ते पोषक असेल असा प्रयत्न करा. जंकफूड खाण्याच्या आधी ''मी हे खाणं टाळू शकतो का? या ऐवजी दुसरं काही खाऊ शकतो का? हे स्वतःला विचारा. शक्य होईल तेवढी झोप पूर्ण करणं, झोपेचा वेळ सोशल मीडिया, टीव्ही, streaming app या पायी वाया जाऊ न देण्याचा प्रयत्न करा.

Article by Dr. Srigurudas Dandekar on Lifestyle and Health
आयुष्यमान कार्ड योजनेत राज्यात सिंधुदुर्ग आघाडीवर; ५ लाखाचा आरोग्य विमा मोफत, जाणून घ्या प्रक्रिया

जमेल तेव्हा कामापासून ब्रेक घेणं, कुटुंबीय, मित्र यांच्यासमवेत वेळ घालवणं, एखादा छंद जोपासणं, आवडतं संगीत ऐकणं, आध्यात्मिक मार्गाची आवड असेल तर त्यासाठी वेळ देणं, पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणं, प्रवास करणं यामुळे मानसिक आरोग्य टिकण्यास मदत होईल. वर दिलेले जीवनशैलीमधील बदल कोणाला जमतील तर कोणाला नाही; परंतु, एक गोष्ट प्रत्येकाला जमलीच पाहिजे ती म्हणजे स्वत:च्या शरीराचं ऐकणं. आपलं शरीर, आपली प्रत्येक अवयवसंस्था विविध लक्षणांच्या माध्यमातून त्यांना होणारा त्रास सांगण्याचा प्रयत्न करत असते.

Article by Dr. Srigurudas Dandekar on Lifestyle and Health
होत राहतील कैक इलेक्शन, कशाला घेता मरणाचं 'टेन्शन?'; तज्ज्ञांचा राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला

आजार किरकोळ असो व मोठा, शारीरिक असो व मानसिक, त्याची लक्षणे खूप आधीपासून दिसत, जाणवत असतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे, तज्ञांची मदत घेणे, त्यावर योग्य तपासण्या आणि गरज पडल्यास उपाय करणे हे महत्वाचे आहे. वयाच्या चाळीशीनंतर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे तपासणी, योग्य चाचण्या यामुळे होऊ घातलेले आजार टाळता येतील तसेच एखादा आजार जडला असेल तर त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करता येतील. पूर्वी जीवघेणे वाटणारे बरेच आजार आता उपचारांनी पूर्णपणे बरे होतात.

दुर्दैवाने, तुम्हाला एखादा आजार जडला असल्यास त्याबद्दल नकारात्मक विचार न करता योग्य ते उपचार तज्ञांच्या सल्ल्याने चालू करणे, नियमित उपचार स्वतःच्या मर्जीने बंद न करणे, पथ्य सांभाळणे या गोष्टींनी आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो/आटोक्यात राहू शकतो तसेच शरीरावरचे त्याचे दुष्परिणाम कमी होतात. शारीरिक/मानसिक तक्रारींचे निराकरण/तपासण्या/ उपचार हे मानयताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकाकडून करून घ्यावेत. थोड्या फायद्यासाठी अयोग्य व्यक्तीकडून उपचार घेतल्यास शरीराचे कायमचे नुकसान होऊ शकते. सोशल मीडीया डॉक्टर ही मानसिकताच अघोरी असून, त्याच्या फायद्यापेक्षा तोटेच अधिक.

गुगलवरील माहिती ही गुगलवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीसापेक्ष असते आणि तुम्हाला असणाऱ्या लक्षणांवरून अनेकदा त्याच्याशी आपण साधर्म्य साधून निदान करण्याचा व आपल्या अपूर्ण व अपरिपक्व ज्ञानाने उपचार घेण्याचा प्रयत्न करून बहुतांशीवेळा स्वत:चे नुकसान करून घेतो. याच गडबडीत आपण स्वतःच्या डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत करून स्वत:च निर्माण केलेल्या साशंकतेच्या भोवऱ्यात अडकतो. उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा, चांगल्या सुविधा, अत्याधुनिक व अचूक चाचण्या, अत्याधुनिक उपचार हे खर्चिक असतात, उपचार उपलब्ध आहे; पण ऐपतीच्या बाहेर आहे अशी अवस्था होऊ नये म्हणून प्रत्येकाने स्वत:चा आणि आपल्या कुटुंबीयांचा आरोग्यविमा घेणं क्रमप्राप्त आहे, ही काळाची गरज आहे.

Article by Dr. Srigurudas Dandekar on Lifestyle and Health
मानसिक आरोग्य म्हणजे काय?

आरोग्यविमा पॉलिसीची सखोल माहिती घेऊन, शहानिशा करून आणि तज्ञ माणसाच्या सल्ल्याने ती खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. आरोग्यविषयक शंकांचं निरसन करणाऱ्या या लेखमालिकेमध्ये प्रत्येक विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्स नेहमी आढळणाऱ्या आजारांबद्दल माहिती देतील. आजारांची लक्षणे, तपासण्या, उपचार, आजार होऊ नये म्हणून काय करता येईल, प्राथमिक स्वरूपाचे आजार असल्यास ते अधिक बळावून त्याचे दुर्धर आजारात रूपांतर होऊ नये आणि प्राथमिक असणारे आजारही आटोक्यात आणून बरे करण्यासाठी काय करता येईल तसेच या सर्व गोष्टींसाठी आपल्या जीवनशैलीत दैनंदिन आव्हाने लक्षात घेऊन कोणते सकारात्मक बदल घडवता येतील, याचेही मार्गदर्शन करतील.

(लेखक भूलतज्ज्ञ व अतिदक्षता विभागतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.