local Industry Business
local Industry Businessesakal

Local Industry Business : स्थानिक उद्योग आणि उद्ममशीलता

उद्योग साकारताना उद्योजकाला मोठ्या दिव्यातून सामोरे जावे लागते.
Published on
Summary

उद्योगाची निवड करण्यासाठी उद्योजकांनी आधी डोळसपणे दुसरे उद्योग कसा चालवतात याचे निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे असते.

-प्रसाद अरविंद जोग (theworldneedit@gmail.com)

सन २०२२ आणि सन २०२३ मध्ये उद्योजकता या विषयाला आधारभूत अशा ‘धरू कास उद्योगाची’ या सदरातून विविध उद्योग संधी व उद्योजकता या विषयावर लेखनाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता आला. वाचकांना, उद्योगप्रेमींना, भविष्यात उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या नव उद्योजकांना (Entrepreneur) प्रेरक ठरू शकेल, अशी उद्योजकीय माहिती देण्यात आली.

सन २०२४ या नव्या वर्षात उद्योग प्रामुख्याने स्थानिक उद्योगावर भाष्य करताना त्याचे स्थानिक तसेच जागतिक आयाम तपासून पाहूया. स्थानिक उद्योग आणि उद्यमशीलता लोकल ते ग्लोबल का होत नाही, याचा वेध घेऊया.

उद्योग साकारताना उद्योजकाला मोठ्या दिव्यातून सामोरे जावे लागते. मूर्तिकार किंवा शिल्पकार एखादी मूर्ती साकारताना दगडातला नको असलेला भाग काढून टाकतो तसेच उद्योगाला साकारताना उद्योजकाला आपल्यामधील नकारात्मकता, धरसोड वृत्ती, एकाग्रतेचा अभाव, आळस, अनामिक भीती अशाप्रकारच्या भावनांचा त्याग करून एक लाईफ मिशन जीवन ध्येय म्हणून आपल्या उद्योगाला घडवावे लागते.

local Industry Business
Hit and Run Law, Truck Drivers Strike : संपामुळं राज्यात 15 लाख ट्रकची चाकं थांबली; तब्बल 500 कोटींचं नुकसान

बदल हा प्रकृतीचा स्थायीभाव असल्याने उद्योजकाला बदलत्या परिस्थितीचा, बदलत्या गरजांचा आढावा घेऊन नियोजनात्मक पद्धतीने उद्योग साकारावा लागतो. उद्योग साकारताना उद्योजकाला सुरुवातीच्या दिवसात उद्योजकीय अभिप्रेरणा, उद्योग संकल्पना, उद्योजकता विषयातील मूलभूत गोष्टी यांचे ज्ञान आवश्यक असते. धरू कास उद्योगाची म्हणताना आपण उद्योग का करावा? कोणत्या उद्योग संधींना आपल्या स्थानिक उद्योजकांना कोकणात प्रत्यक्षात आणता येईल, उद्योजकीय समृद्धता कोकणात आणण्यासाठी आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून पर्यावरणस्नेही व पर्यावरणपूरक उद्योग कोकणात कसे उभारता येतील याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

कोकणात उद्योजकता रुजावी, वाढावी म्हणून तरुणांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही लेखमाला लिहिली होती. आपण उद्योग करू शकतो किंवा मी यशस्वी उद्योजक होणारच अशी मनाची तयारी होण्यासाठी उद्योजकता हेच करिअर ही गोष्ट स्वीकारण्याची वृत्ती उमद्या युवा वर्गामध्ये वाढवणे अपेक्षित होते. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर तरी उद्योजकीय मानसिकता का कोसो दूर...असा प्रश्न उद्योजकांना पडला पाहिजे तरच उद्योजक म्हणून आपण काय स्वीकारले पाहिजे, काय बदलले पाहिजे, काय टाळले पाहिजे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होतील.

local Industry Business
बदनामीचा कोणी प्रयत्न करत असेल, तर जशास तसे उत्तर देणार; अमल महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा

उद्योजकांच्या आयुष्यात नवी सकाळ यावी त्यांना उद्योग सुरू करत असताना आत्मविश्वास मिळावा, उद्योजकांना उद्योजकीय संकल्पना समजून याव्या म्हणून नव्या वर्षीच्या नव्या लेखमालेचे शीर्षकच आहे. आपण उद्योग का करायचा, कोठे करायचा, या प्रश्नांची उत्तरे आपण विविध लेखांमधून मिळवलेली आहेतच आता आपण उद्योजकांनी उद्योग कसा करायचा हे या नव्या लेखमालेतून पाहणार आहोत.

उद्योगाची निवड करण्यासाठी उद्योजकांनी आधी डोळसपणे दुसरे उद्योग कसा चालवतात याचे निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे असते. उद्योजक एखाद्या उद्योगात यशस्वी होत असतील तर ते का होतात? अपयशी होत असतील तर त्याची कारणे काय? उद्योग साकारताना उद्योजकाला आपली कार्यपद्धती कशी ठेवावी लागते? आपल्या उद्योग धंद्याचे व्यवस्थापन कसे करावे लागते याच सर्व गोष्टी सहजतेने समजून घेऊया.

local Industry Business
जगातील टॉप 5 गायकांची यादी जाहीर; पहिल्या नंबरवर कोण? यादीत भारतीय गायकाचं नाव आहे?

या लेखमालेच्या अनुषंगाने

डेमोग्राफिक चेंज मुळे बदलते मार्केट स्वरूप, हवामानामुळे होणारे व्यवसाय क्षेत्रात करावे लागणारे बदल, उद्योग उभरणीतील विविध टप्पे कोणते? व ते कसे हाताळावे; उद्योजकाने स्वत:चे व स्वत:च्या उद्योग व्यवसायाचे SWOT मूल्यमापन कसे करावे, उद्योग साकारताना आवश्यक ते परवाने कोठून मिळवावे, आपल्या उत्पादित मालाची गुणवत्ता चाचणी कुठून करून घ्यावी, बिझनेस क्लस्टर म्हणजे काय? बिझनेस इंकयुबेशन सेंटर म्हणजे काय? आपल्या व्यवसायात इनोव्हेशन कसे आणावे? प्रकल्प अहवाल कसा बनवायचा?

उद्योग उभारताना कोणत्या गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे,आपल्या उद्योगाला लागणारी भांडवल उभारणी आपण कशी करावी? उद्योजकांनी आपली बिझनेस टीम कशी तयार करावी? कोणत्या गोष्टींवर जास्त रिसर्च करण्याची गरज आहे? अद्ययावत पॅकिंग कसे असावे? उद्योग साकारताना काय करावे आणि काय करू नये? ग्राहक सेवा कशी करावी? सेवा क्षेत्र चांगले का उत्पादन क्षेत्र चांगले? उद्योजक म्हणून आपली विश्वासर्हता कशी वाढवावी?

उद्योजकांनी आपल्या वेळेचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे? उद्योजकतेची मूलतत्त्वे कोणती? जूनून, जुगाड, आणि जोखीम घेण्याची वृत्ती असलेले उद्योजक कसे उद्योजकीय आविष्कार घडवून आणू शकतात? कोकणातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करत असताना आपण अगदी फुटक्या करवंटीतूनही कसा पैसा मिळवू शकतो, अशा विविध गोष्टींचा उहापोह करणार आहोत.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()