Peepal Tree
Peepal Treeesakal

पिंपळपार : लहानपणीचे दिवस आठवले की, मन अजूनही 'त्या' रम्य आठवणींचा मागोवा घेऊ लागतं!

देवरुखसारख्या गावाचे नावच अशा शेकडो पारांमुळे देवरुख म्हणजेच देववृक्षांचे गाव असे पडले आहे.
Published on
Summary

पिंपळ हा या पारांसाठी निवडलेला गेलेला एक प्रमुख वृक्ष. भगवान श्रीकृष्णांनी संगीतलेली गीता आणि भगवान बुद्धाना झालेली ज्ञानप्राप्ती यामुळे हा देववृक्ष ज्ञानाचे प्रतिक मानला जातो.

-प्रतीक मोरे

रात्री जेवणाची वेळ उलटून चालली आणि कोणी पुरुष मेंबर जाग्यावर नसला की, त्याला शोधायला घरच्यांची पाहिली धाव पडायची ती पारावर. पिंपळ (Peepal Tree), वड, उंबर अशा दीर्घायुषी वृक्षांना हेरून त्यांच्याभोवती मातीची भर घालून पार बांधण्याची पद्धत नक्की केव्हा अस्तित्वात आली हे ठाऊक नाही, पण जुन्या आळी, पेठा किंवा वाड्या असणाऱ्या गावात असे पार मात्र अनेक वर्षांपासून आहेत. अनेक ठिकाणचे महत्त्वाचे पत्ते, एसटी थांबेच या पारांनी ठरवले असल्याचे कोकणात ठिकठिकाणी दिसून येते. या पारांना एक सांस्कृतिक, सामाजिक महत्त्वही आहे.

Peepal Tree
Konkan Special Story : कोकणी गो लोक हे..

लहानपणीचे दिवस आठवले की मन अजूनही त्या रम्य आठवणींचा मागोवा घेऊ लागतं. ९०चे दशक तसे स्थित्यंतराचे. घरोघरी वीज नुकतीच पोहोचलेली. टीव्ही, रेडियो कुठकुठ चुकून असायचे. त्याचंदेखील २४ तास प्रसारण सुरू झाले नव्हते. सकाळची वर्तमानपत्रेच बातम्या मिळवण्याचा जगाशी कनेक्टेड राहण्याचा एकमेव मार्ग. अशा काळात पारावर चकाट्या पिटणे किंवा गजाली मारणे ही प्रथा बहरास आली यात नवल नाही.

जुन्या काळातील दळणवळणाच्या वाटा, मुख्यता घाटवाटांवरून उतरणारे प्रवासी आणि धनगर, कातकरी किंवा लाकडाच्या मोळ्या विकायला येणारे दुर्गम भागातील बांधव यांचे रस्ते अशा पारांनी सहज ओळखू येतात. लाकडाची मोळी खाली ठेवावी, पाणी प्यावे आणि भाकरी सोडावी, उन्ह वर आली असल्यास तिथे पारावरच थोडी डुलकी घ्यावी आणि मग पुढच्या मार्गास मार्गस्थ व्हावे असा संपूर्ण दिनक्रम अशा पारांशी जोडला गेलेला दिसायचा. वड आणि मुख्यता पिंपळ हे सदाहरित वृक्ष. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात इतर सर्व झाडांची पानझडी झालेली असताना आपल्या पानांच्या मंद वाऱ्याने आणि सावलीने नटलेले हे पार वर्षानुवर्षे पांथस्थाना सेवा विनामुल्य पुरवत आहेत हे विशेष.

Peepal Tree
Family life Problems : घर बघावे बांधून अन् मूल बघावे वाढवून...

देवरुखसारख्या गावाचे नावच अशा शेकडो पारांमुळे देवरुख म्हणजेच देववृक्षांचे गाव असे पडले आहे. आयुर्वेदात उल्लेख असणारे, हिंदू धर्मात (Hinduism) पवित्र मानले जाणारे आणि आपली फळे, पाने आणि औषधी गुण धर्मानी सर्व जीवसृष्टीस उपकृत करणरे हे वृक्ष खऱ्या अर्थाने देववृक्ष आहेत. अशा देव वृक्षांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांच्याभोवती पार बांधून, त्यांच्या छायेखाली विविध देवतांची स्थापना करून या वृक्षाना देवत्व बहाल करणारे आपले पूर्वज हे खऱ्या अर्थाने धोरणी म्हणावे लागतील.

पिंपळ हा या पारांसाठी निवडलेला गेलेला एक प्रमुख वृक्ष. भगवान श्रीकृष्णांनी संगीतलेली गीता आणि भगवान बुद्धाना झालेली ज्ञानप्राप्ती यामुळे हा देववृक्ष ज्ञानाचे प्रतिक मानला जातो. या झाडामध्ये देवी-देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते. पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते, यातूनच पारावरच्या पूजा घालण्याची प्रथा निर्माण झालेली दिसते.

Peepal Tree
अनोखं कोकण : 'कोकण म्हणजे नुसता बीच नाही, तर बीच-बीच में निसर्गाचा विविधरंगी समुद्र अनुभवा!'

काही मंडळांच्या पारावरच्या पुजाना शंभरहून अधिक वर्षाची परंपरा आहे. या पूजेच्या निमित्ताने होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके आणि सम्मेलने यांनी सामाजिक अभिसरणामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. देवरुख मधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी समतानंद गद्रे यांनी अशा पारावरच्या पूजेमध्ये झुणका भाकरीचा प्रसाद वाटप करून सामाजिक अभियांत्रिकी साधलेली होती. वैदिक वाड्.मयात एक उपयुक्त यज्ञीय वृक्ष म्हणून याचा अनेकदा उल्लेख आढळतो; बृहत्संहितेत घराच्या पश्चिमेस वृक्ष लावणे शुभ असून घरबांधणीत मात्र त्याचे लाकूड वापरू नये असे सांगितले आहे. गौतम बुध्दांचा या वृक्षाशी निकट संबंध आल्याने याला ‘ बोधी वृक्ष ’ व ‘ बोधिद्रुम ’ अशी नावे आहेत. श्रीलंकेतील अनुराधपुरचा अश्वत्थ वृक्ष सु. २,२०० वर्षापूर्वीचा आहे असे म्हणतात.

पर्यावरणाच्या दृष्टीने या देववृक्षांचे अजून एक महत्त्व आहे. ऑक्सिजन पुरवठा हे आहेच परंतु वड, पिंपळ उंबर या झाडांना इंग्रजीमध्ये फिग म्हटले जाते. यांची रसिली, जाडसर आणि लिपीड व शुगर यांनी रसरसलेली फळे अनेक पक्षी प्राणी यांना अन्न प्रदान करतात. फळे बहरण्याच्या काळात कावळे, राज्यपक्षी हरियल, तांबट, पोपट आणि मुख्यत्वे सर्व धनेश पक्ष्यांच्या प्रजातींची झुंबड या झाडांवर उडालेली दिसते. ही फळे खाऊन त्यांच्या बिया दूरवर पोहोचवण्याचे कामही या पक्ष्यांकडून साकार होते. त्यामुळेच हे वृक्ष आणि पक्षी यांच्यात सहजीवन निर्माण झाले आहे.

Peepal Tree
PCOS Disease Symptoms : 'पीसीओएस' म्हणजे आजच्या तरुणींमधील वाढती समस्या

या पक्ष्यांचे पुनरुत्पादनच या देववृक्ष्यांच्या फुलण्यावर आणि बहरण्यावर ठरत असतो. असे हे देववृक्ष हल्लीच्या काळात मात्र धोक्यात आले आहेत. शहरांची वाढ, रस्ते रुंदीकरण आणि इतर कारणामुळे अनेक वृक्षांची तोड होते आहे. नवीन वटवृक्ष लावून तो बहरण्यास शेकडो वर्षे लागतात. त्यामुळेच पूर्वजांनी दूरदृष्टीतून राखलेले असे वटवृक्ष आणि पिंपळपार फक्त टिकवणेच नव्हे तर प्रेमाने सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.