Business
Businessesakal

उद्योग साकारताना : 'जेवढा स्पष्ट, तेवढे उद्योगाचे उद्दिष्ट अधिक स्पष्ट'

स्थानिक पातळीवर एखादा उद्योग (Business) सुरू होतो व काळाच्या ओघात बंद होऊन जातो.
Published on
Summary

उद्योग साकारताना सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ते म्हणजे उद्योजकाच्या मनात स्वत:च्या उद्योगाविषयी ब्ल्यु प्रिंट तयार होणं व स्वतः उद्योजकाने आपण उद्योग का सुरू करतोय याची किमान पाच कारणे तरी लिहून काढणे.

-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com

स्थानिक पातळीवर एखादा उद्योग (Business) सुरू होतो व काळाच्या ओघात बंद होऊन जातो. कारण, कोकणात अजूनही मुंबई, पुणे यासारख्या शहरात जाऊनच आपल करिअर होऊ शकते, अशा भ्रामक विश्वासात आपली तरुणाई वावरत असून, परंपरागत चालत आलेले व्यवसाय धंदे आपल्या स्थानिक उद्योजकांच्या हातातून निसटत चालले आहेत.

दुर्दैवाने, कोकणी माणसाने आपल्या कोकणातील (Konkan) मातीत असलेली श्रीमंती ओळखलीच नाही व पैशासाठी प्रसंगी पदरच्या जागा विकून मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरात राहणे पसंत केले. कारण त्यामध्ये आपल्या तरुणाईला एक कम्फर्ट झोन दिसून येत होता आणि उद्योजकतेचे पहिलेच तत्त्व आपल्याला आपला कम्फर्ट झोन मोडायला शिकवते.

Business
Family life Problems : घर बघावे बांधून अन् मूल बघावे वाढवून...

आपण जर धोका पत्करून वेगळ्या शहरात जाऊन नोकरी करून श्रीमंत होऊ शकतो तर तसाच वाजवी धोका पत्करून स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यासाठी पूर्णांगाने उद्योजकतेचा का विचार केला गेला नाही? हे युवावर्ग म्हणून शोधणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपल्याला कोकणात भविष्यात वेगवेगळे उद्योग साकारले जात असल्याचे आशादायक चित्र पाहायला मिळेल. आपल्या गरजा काय? लोकांच्या गरजा काय? आपल्या गरजांचे प्राधान्यक्रम काय? याची योग्य उजळणी झाल्यानंतर उद्योजकाची उद्योग सुरू करतेवेळी असणारी मानसिकता नक्की काय असणार आहे? उद्योजक म्हणून उद्योग का सुरू करायचा आहे याची स्पष्टता शीघ्रतेने येणे गरजेचे आहे.

Business
अनोखं कोकण : 'कोकण म्हणजे नुसता बीच नाही, तर बीच-बीच में निसर्गाचा विविधरंगी समुद्र अनुभवा!'

उद्योग साकारताना सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ते म्हणजे उद्योजकाच्या मनात स्वत:च्या उद्योगाविषयी ब्ल्यु प्रिंट तयार होणं व स्वतः उद्योजकाने आपण उद्योग का सुरू करतोय याची किमान पाच कारणे तरी लिहून काढणे. कागदावर स्वतःच्या हाताने स्वत:च्या भाषेत आपले उद्योग करण्यामागचे नक्की प्रयोजन लिहिल्यामुळेच पुढील उद्योग कसा असावा, याची अटकळ उद्योजकाला नीट बांधता येते. उद्योग प्रेरणा नक्की काय आहे? हे उद्योजकाला समजून आले तर उद्योगाला लवकर गती देता येते नाहीतर अपेक्षांच्या, स्पर्धेच्या, कर्जाच्या ओझ्याखाली उद्योजक उद्योग उभारी घ्यायच्या आतच दबला जातो.

Business
PCOS Disease Symptoms : 'पीसीओएस' म्हणजे आजच्या तरुणींमधील वाढती समस्या

स्वयंप्रेरणेने व एकच ध्येयाने प्रेरित होऊन सुरू केलेले उद्योगच आपल्याला काहीतरी वेगळं करून स्पर्धेत टिकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसून येतात. लोकल टू ग्लोबल होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जर आपल्यातील उद्योजक धडपड करत असतील तर सर्वात आधी त्यांनी आपले उद्योजकीय अस्तित्वच का निर्माण झालेले आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे. मनात आलं म्हणून एखादा उद्योग सुरू केला किंवा चालला तर चालला या भरवशावर आई-वडिलांची एखादी एफडी मोडून भांडवल गुंतवून उद्योग सुरू केला किंवा एखादी आपल्याला त्या व्यवसायातील फारशी गती नसलेली फ्रेंचाईजी विकत घेतली तर हमखास अपयश हे ठरलेलेच.

Business
पिंपळपार : लहानपणीचे दिवस आठवले की, मन अजूनही 'त्या' रम्य आठवणींचा मागोवा घेऊ लागतं!

कारण, मुळात उद्योजक म्हणून आपण उद्योगच का सुरू केला याचे कोणतेही ठोस उत्तर देण्यातील अनपेक्षित असमर्थता. उद्योग साकारताना लोकल टू ग्लोबल असा प्रवास करायचा असल्यास डॉक्युमेंटेशनला पर्याय नाही. आपले व्हिजन काय आपले, मिशन काय, आपल्याला आपल्या उद्योगातून नक्की काय साध्य करायचे आहे त्यासाठी आपण कोणत्या धोरणांचा अवलंब करणार आहोत? कोणत्या स्ट्रॅटेजीज आपण आपल्या उद्योग व्यवसायासाठी वापरणार आहोत? आपले बाजारातील प्रतिस्पर्धी कोण आहेत? याचा अंदाज आपल्या शब्दात जर कागदावर मांडला गेलेला असेल तर आणि तरच उद्योजक म्हणून उद्योग साकारताना आपल्याला कमीत कमी अडणींना तोंड द्यावे लागेल.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()