Business
Businessesakal

Konkan Business : कोकणात उद्योगधंदे बंद-आजारी का पडतात?

दीर्घकालीन उद्दिष्ट गाठण्यासाठी एक स्वप्न उराशी बाळगून जर उद्योग साकारला गेला तर त्यात चांगले यश मिळते.
Published on
Summary

उद्योगाचा सर्व अंगाने विचार केला, परिपूर्ण अभ्यास केला तर उद्योग विकसनाच्या अवस्था व उद्योगाचे जीवनचक्र उद्योजकाच्या लक्षात येऊ शकते.

-प्रसाद अरविंद जोग (theworldneedit@gmail.com)

पहिल्याच दिवशी उद्योग व्यवसाय (Business) कसा पैसे मिळवून देऊ शकेल? पहिल्याच दिवसापासून जर पैसा मिळवू, या विचारसरणीने कोणी उद्योग सुरू करत असेल तर ती योग्य उद्योजकीय मानसिकता नक्कीच नाही. दीर्घकालीन उद्दिष्ट गाठण्यासाठी एक स्वप्न उराशी बाळगून जर उद्योग साकारला गेला तर त्यात चांगले यश मिळवून उद्योजकाला आपला उद्योग व्यवसाय स्थानिक पातळीवरून वैश्विक पातळीपर्यंत नेण्यात कोणतीही अडचण उद्भवत नाही.

उद्योग हा सुरवातीच्या काळात अपरिपक्व किंवा बाल्यावस्थेत असतो तसेच पहिल्या पिढीतील उद्योजक हाही अति आत्मविश्वासू, चंचल, एकाग्र वृत्ती नसलेला, धरसोड वृत्तीने फक्त नफ्यासाठी सतत उद्योगाच्या प्रकारात, संरचनेत बदल करणारा अपरिपक्व असेल तर उद्योगसुद्धा आहे त्याच अवस्थेत राहून फलदायी होत नाही, असे बजावणारा हा लेख...

Business
Hemorrhoids Symptoms : मूळव्याधीतही होमिओपॅथीचा सम्यक विचार; 'या' लोकांना ही व्याधी उद्भवण्याची शक्यता जास्त!

उद्योग सुरू करताना चांगले नियोजन केले; आपण सुरू करत असलेल्या उद्योगाचा सर्व अंगाने विचार केला, परिपूर्ण अभ्यास केला तर उद्योग विकसनाच्या अवस्था व उद्योगाचे जीवनचक्र उद्योजकाच्या लक्षात येऊ शकते. प्रारंभिक किंवा सुरवातीचा पहिला टप्पा, वाढीचा किंवा विस्ताराचा दुसरा टप्पा, परिपक्वतेचा किंवा उद्योग वैश्विक पातळीवर नेऊन उद्योग धोरणात (Industry Policy) अपेक्षित बदल करत नवे आविष्करण करण्याचा तिसरा टप्पा, उद्योगाचा अंतिम टप्पा असे उद्योग विकसन चक्र चार अवस्थांतून संक्रमित होत जात असते.

Business
गावठी वकील आत्माराम काका : काकांनी आयुष्यभर एकच व्यवसाय केला, तो म्हणजे साक्षीदाराचा!

या चार अवस्थांपैकी पहिल्या दोन अवस्थांपर्यंत उद्योजकाला स्वतःला त्या उद्योगाबरोबर एकरूप होऊन निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या सर्व क्षमतांचा पुरेपूर वापर करून न कंटाळता न थकता सकारात्मक मानसिकतेने सक्रियता दाखवावी लागते तर आणि तरच उद्योग व्यवसायाची घडी नीट बसते. उद्योजकाकडे जर संयम नसेल तर चुकीचे निर्णय वेगाने व अनपेक्षितरित्या घेतले जाऊन उद्योग फुलायच्या, विस्तारायच्या आधीच कोमेजून जाऊ शकतो. मानसिकदृष्ट्या सक्षम असणे, भावनात्मकतेपेक्षा व्यावसायिक उत्कर्षासाठी व्यवहारिक असणे, सजग असणे, आवश्यक प्रगल्भता दाखवण्याचे धारिष्ट्य दाखवणे हे गुण उद्योजकाला सुरवातीच्या काळात उद्योगात टिकून राहण्यासाठी उपयोगाचे असतात.

बुद्धिबळाच्या खेळात जसे आपली प्यादी, मोहरे टिकवण्याकडे लक्ष दिले जाते तसेच एक समजदार उद्योजक आपल्या उद्योगवाढीसाठी अनावश्यक ताण न घेता उद्योग स्थिरावण्यासाठी किंवा उद्योगात टिकून राहण्यासाठी लागणारा नैसर्गिक वेळ आपल्या उद्योगाला देण्याचा समंजसपणा दाखवतो. संयम, चिकाटी, सचोटी व प्रयत्नांमधील सातत्य या गुणांवर सुरवातीच्या उद्योजकीय वाटचालीत सावध भूमिका घेऊन उद्योजकाला कसोटी क्रिकेटप्रमाणे आपला बळी जाऊ न देता आपली धावसंख्या म्हणजे आपल्या उद्योगाचे बॅलन्सशिट (ताळेबंद) वाढवायचे असते. संयम, मनोनिग्रह यांमुळे उद्योगाच्या प्रारंभिक टप्प्यावर अन्य प्रलोभनांपासून, चुकीच्या संगतीपासून व अनाहूत, अवाजवी सल्ला देणाऱ्या अतिउत्साही उद्योजक मित्रांपासून सावध राहता येते.

उद्योग प्रारंभिक अवस्थेत असतानाच किंवा बाल्यावस्थेत असतानाच बंद का पडतात किंवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे पोषक वातावरण असून कोकणात उत्साहाने सुरू झालेले उद्योगधंदे बंद किंवा आजारी का पडतात, याची कारणमीमांसा करताना उद्योग करण्यासाठी लागणाऱ्या संयमाची कमतरता, उद्योग सुरू करण्याची घाई आणि तेवढ्याच प्रमाणात ते बंद करण्याची अतीवघाई, साधारणपणे उद्योग सुरू होऊन तो ना नफा ना तोटा बिंदूवर येण्यासाठी काही दिवसांचा म्हणजे साधारणपणे १ हजार दिवसांचा कालावधी लागतो, असे मानल्यास तेवढेही दिवस आपल्या उद्योगास न देण्याची वृत्ती किंवा अधीर मानसिकता, फक्त सबसिडी मिळवण्यासाठी सुरू केलेले ध्येयहिन, उद्दिष्टहिन उद्योग.

Business
Konkan Forest : नंदूचे जंगल - 'ते जंगलपण सैराट होऊन या वेड्या परश्यावर प्रेम करू लागले'

व्यवसायाच्या सुरवातीलाच कर्ज फेडलेच पाहिजे, अशा विचारांनी घेतलेला अतिरिक्त ताण, खेळत्या भांडवलाचा अभाव किंवा आपत्कालीन परिस्थितीत कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी नसलेली तयारी किंवा अपुरी तयारी, व्यवस्थापनात्मकदृष्ट्या योग्य नसलेले निर्णय अहंगड किंवा न्यूनगंड म्हणून सातत्याने घेतले जाणे, अविचारीपणा, अव्यवहारीपणा आणि उतावळेपणा उद्योजकाच्या स्वभावात भरपूर प्रमाणात असणे. प्रामाणिकपणा, सचोटी याला बगल देऊन चुकीच्या मार्गाने, पैसा उभा करण्याची धडपड, आपल्याच क्षमतांवर आपणच दाखवलेला अविश्वास किंवा फाजील आत्मविश्वास, अशा बाबी पुढे येतात.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.