Uddhav Thackeray vs Sunil Tatkare
Uddhav Thackeray vs Sunil Tatkareesakal

Uddhav Thackeray : तटकरेंसमोर ठाकरेंनी उभं केलं मोठं आव्हान; अजितदादा गटाचं वाढलं टेन्शन

लोकसभा निवडणूक लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून जनसंवाद दौऱ्याला सुरुवात केली.
Published on
Summary

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा केवळ दोन हजार मतांनी निसटता पराभव झाला होता.

चिपळूण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनसंवाद मेळाव्यातून अजित पवार गटातील एकमेव रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना मोठे आव्हान उभे केले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करत याच मतदारसंघात तब्बल पाच जाहीर सभा घेतल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांना मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून जनसंवाद दौऱ्याला सुरुवात केली. त्यात उद्धव ठाकरेंची तोफ शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपवर धडाडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत रायगडकर पुढील निवडणुकीत मोदींच्या विरोधात त्सुनामीसारखे मतदान करणार आणि आपला उमेदवार निवडून आणणार, असे जाहीर आवाहन ठाकरेंनी जनतेला केले.

Uddhav Thackeray vs Sunil Tatkare
राज्यातील 20 ते 22 आमदारांसोबत स्वत: बोललोय, ते कोठेही जाणार नाहीत; सतेज पाटलांनी दिली महत्त्वाची अपडेट

या वेळी ठाकरेंच्या सर्वच सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा केवळ दोन हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. रायगड लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी तटकरेंना पराभवाची धूळ चारली होती; परंतु त्याची परतफेड तटकरेंनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून अनंत गीते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी ठाकरेंच्या जनसंवाद सभांमधून बोलून दाखवले आहे.

Uddhav Thackeray vs Sunil Tatkare
कर्नाटक विधानसभेत भाजपच्या 'जय श्रीराम'ला काँग्रेस आमदारांनी दिलं 'जय भीम'च्या घोषणेनं उत्तर

रायगड लोकसभा मतदार संघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील अलिबाग, महाड आणि दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर फक्त गुहागर विधानसभा मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव हे सध्या ठाकरे गटात आहेत. यातच पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रवींद्र पाटील तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्री आदिती तटकरे आमदार आहेत.

Uddhav Thackeray vs Sunil Tatkare
फुटीनंतरही पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा बालेकिल्ला भक्कम; मोदींची लाट असतानाही जिंकल्या 'इतक्या' जागा

रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी कागदावर हा मतदारसंघ महायुतीसाठी भक्कम आहे; परंतु सध्या पक्षात झालेली फाटाफूट यामुळे रायगडकर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने उभे राहतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाकडून म्हणजेच महायुतीकडून तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीतील शरद पवार गटाकडे असला तरीही येथे ठाकरेंची ताकद अधिक आहे. त्यामुळे आघाडीकडून ठाकरेंना हा मतदारसंघ दिला तर पुन्हा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना रिंगणात येऊ शकतात. तसे झाल्यास तटकरे विरुद्ध गीते असा सामना अटातटीचा ठरू शकतो.

सुनील तटकरे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांचे घर फोडले. त्यांना या वेळी जनता मतदानातून त्यांची जागा दाखवणार आहे. मतदार निवडणुकीची वाट बघत आहेत. महाविकास आघाडीचे कोकणातील सर्व खासदार निवडून येतील.

-अनंत गीते, माजी खासदार रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.