Konkan Business
Konkan Businessesakal

Konkan Business : सतत कारणे देणाऱ्याचा उद्योग वाढत नसतो!

निर्णयक्षमता पूर्णपणे विकसित न झालेले उद्योजक (Business) आपल्या उद्योगाचे प्रतिनिधित्व योग्यप्रकारे करू शकत नाहीत.
Published on
Summary

योग्य निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे अधिकार, कर्मचाऱ्यांना बहाल करणे.

-प्रसाद अरविंद जोग (theworldneedit@gmail.com)

तकलादू कारणे देणे, टाळाटाळ करणे, चालढकल करत एखादा निर्णय किंवा आवश्यक कृती सातत्याने लांबणीवर टाकणे, वेळकाढूपणा करत राहणे अशा सवयी उद्योगकर्त्याच्या किंवा त्याच्या आस्थापनेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगी बाणवायला लागल्या तर ही त्या उद्योगासाठी धोक्याची घंटा समजावी. सतत आपण कामात व्यस्त आहोत, असे दाखवून प्रशासकीय जबाबदाऱ्या, वित्तीय जबाबदाऱ्या झटकणारा उद्योजक उद्योगास अनुकूल ठरत नसून, मारकच ठरतो.

Konkan Business
Eye Disease : 'काचबिंदूचे वेळेत निदान नाही झाले, तर कायमचे अंधत्व येऊ शकते!'

निर्णयक्षमता पूर्णपणे विकसित न झालेले उद्योजक (Business) आपल्या उद्योगाचे प्रतिनिधित्व योग्यप्रकारे करू शकत नाहीत. आत्मविश्वासाचा अभाव असलेले, जबाबदारी घेण्याची सवय नसलेले आणि स्वतःची स्वतंत्र विचारशक्ती नसलेलं मनुष्यबळ नियुक्त केले गेल्यास उद्योगाची प्रगती खुंटते हे वास्तव आहे. उद्योजकाने स्वतःला किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना निर्णयक्षम बनवून सतत कारणे देऊन चालढकल करत राहण्याच्या नकारात्मक प्रवृत्तींपासून कसे सुधारावे यावर भाष्य करणारा व उपाययोजना सांगणारा हा लेख!

एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची मनाची तयारी नसेल तर मनाच्या कमकुवतपणामुळे टाळाटाळ करण्याची चुकीची सवय आत्मसात केली जाते. तीच सवय उद्योजकाची मोठी अडचण बनू शकते. योग्य किंवा अयोग्य, हा दर किंवा तो दर असा विचार द्वंद्वात एखादी निविदा जर कर्मचाऱ्याने भरलीच नाही, तर हाती आलेली संधीही उद्योजकाला गमवावी लागू शकते. यासाठी या गंभीर विषयावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना काय असू शकतात, याचा घेतलेला आढावा.

Konkan Business
Health News : पित्ताअभावी अन्नपचन अशक्य असतं!
  • आपल्या अधिकार क्षेत्रात येणारे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास स्वतःला व आपल्या संघाला प्रेरित करणे.

  • आत्मविश्वास (Confidence) वाढीसाठी व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन औपचारिक किंवा अनौपचारिक चर्चासत्राचे आयोजन करणे.

  • स्वतःला किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विचार करायला शिकवून वेळ व्यवस्थापनाची मूल्य समजावून देणे.

  • निर्णय न घेता किंवा टाळाटाळ करून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, हे आपल्या कर्मचारीवर्गाच्या लक्षात आणून देणे.

  • सुरवातीला छोटे छोटे निर्णय घेऊन आपले काम योग्य रितीने पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरवित करून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करणे.

  • निर्णय घेत असताना अविचार किंवा अतिविचार टाळले पाहिजेत, हे स्वतःला व आपल्या कर्मचाऱ्यांना समजावून सांगणे.

  • आस्थापना छोटी असली तरीही प्रत्येक दिवशीचा किंवा आठवड्याचा उत्कृष्ट निर्णयकर्ता व पूर्ण क्षमतेने कार्यपूर्तीकर्ता यांचा सगळ्यांसमोर गौरव करणे.

  • योग्य निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे अधिकार, कर्मचाऱ्यांना बहाल करणे.

  • शक्य असल्यास सुरुवातीच्या काळात त्रयस्त सल्लागाराची व्यवस्थापनात मदत व्हावी म्हणून सल्ला सेवा घेणे.

  • कामाच्या ठिकाणी वेळापत्रक तयार करून त्या प्रमाणेच काम होते आहे की नाही याची छाननी करणे.

  • कामाच्या ठिकाणी सकारात्मक व संतुलित स्पर्धाक्षम वातावरण तयार करणे.

Konkan Business
Konkan Tourism : समृद्ध पक्षीजीवनातून पर्यटन व्यवसायाला मोठी संधी!

‘कारणेरिया’ या रोगाला प्रतिकारक ठरू शकणारी ध्येयधोरणे कठोरपणे स्वतःसह कामाच्या ठिकाणी अंमलात आणावीत. यासाठी गटचर्चा, मुक्त संवाद आणि प्रत्येकाच्या कामाचा आणि प्राप्तीचा आढावा घेण्याची पद्धत विकसित करावी. स्वभावो दूरतिक्रम: असे म्हणतात म्हणजे माणसाचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही; पण उद्योजक म्हणून आस्थापना नावारूपाला आणायची असेल तर उद्योगाच्या भल्यासाठी उद्योजकाला स्वतःला व आपल्या आस्थापनेतील अशा वृत्तीच्या लोकांना बदलासाठी तयार करावे लागेल. मानसिकता बदल व हाती घेतलेल्या कार्याप्रती निष्ठा तसेच तळमळ याच गोष्टी खरी औषधे आहेत. उद्योग, व्यवसायात सातत्य राखून यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. चालढकलपणा, आळशीपणा, जबाबदारी झटकण्याचा चुकीचा पायंडा उद्योजकतेस मारक असून, डोळस उद्योजकाने याकडे वेळीच लक्ष्य दिल्यास उद्योजकांचे निम्म्याहून जास्त प्रश्न सक्रिय सहभाग व वैचारिक बदल या दोन गोष्टींनीच सुटलेले दिसून येतील.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.