SSC HSC Exam
SSC HSC ExamSakal

SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर, बससेवा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान

Published on

ओरोस,ता.१८ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून १८,३७७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. बारावीची २१ फेब्रुवारीपासून, तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. यामध्ये बारावीच्या ९,३०९, दहावीच्या ९,०६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बारावीची परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत.

दहावीची परीक्षा एकूण ४१ परीक्षा केंद्रांवरून घेतली जाणार आहे. संपूर्ण राज्यात एकाचवेळी या परीक्षा होणार असून, याबाबतचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना दिले आहे. परीक्षा प्रवेशपत्रांचे वितरणही करण्यात आले आहे. कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सात भरारी पथके तैनात केली आहेत. प्रत्येक तालुक्यात गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक आणि तहसीलदारांचे पथक तैनात करून त्यांना शाळा भेटीच्या सूचना द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.