Narayan Rane : 140 कोटी जनतेने प्रयत्न केल्यास 2047 पर्यंत भारत महासत्ता बनेल - मंत्री नारायण राणे
जैन, मारवाडी यांचा देशात लोकसंख्येत एक टक्का आहे; मात्र देशाच्या उत्पन्नात २२ टक्के वाटा आहे.
ओरोस : डिजिटल मार्केटिंगमध्ये (Digital Marketing) महिलांना सशक्त करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिक्षणातून उद्योजक बनावे, यासाठी दोन कंपन्या यासाठी काम करीत आहेत. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. नामधारी व्यवसाय नको, त्यातून घर, कुटंब चालले पाहिजे, असा निर्धार करा, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.
केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या नवीन सभागृहात 'सशक्ती परिसंवाद २०२३-२४'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मास्टर कार्ड पुरस्कृत आणि लर्निग लिंक्स फाउंडेशनद्वारा संचलित महिला (Women) उद्योजकता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सध्या व्यवसाय करीत असलेल्या अथवा नव्याने व्यवसाय करू इच्छित असलेल्या लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १९० महिलांना प्रत्येकी ५ हजार ५०० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान केंद्रीयमंत्री राणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
जिल्ह्यात लर्निग लिंक्स फाउंडेशन यांच्यावतीने जिल्ह्यातील १३११ महिलांना आतापर्यंत विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातील निवडक १९० महिलांना प्रोत्साहन अनुदानाचे वाटप मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे सीनियर व्हॉईस प्रेसिडेंट सुनील दुबे, अतिरिक्त व्हॉईस प्रेसिडेंट आशिमा सिंग, झोनल मॅनेजर अपूर्वा शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला पदाधिकारी संध्या तेरसे, संजना सावंत, प्रज्ञा ढवण, मास्टर कार्ड संचालक सौरभ सिंघ रमा अय्यर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना सुनील दुबे यांनी, मास्टर कार्ड प्रशिक्षण देण्याचे काम करते. व्यवसाय करण्याचे प्लॅन देते, अशी माहिती दिली. मधुरा धुरी (साळगाव), जीवदानी माणगावकर या व्यावसायिकांनी आपले विचार व्यक्त केले.
कर्ज नव्हे, प्रगतीचा मार्ग
आज देण्यात आलेले पैसे हे कर्ज नाही. प्रगतीच्या मार्गासाठी हे पैसे दिले आहेत. यातून घरगुती व्यवसाय सुरू करा. महिलांसाठी मोदी सरकारने ‘लखपती दीदी’ ही योजना आणली आहे; मात्र तुम्हाला व्यवसायातून लखपती व्हायचे आहे. देशाच्या १४० कोटी जनतेने प्रयत्न केल्यास २०४७ पर्यंत देश महासत्ता बनेल. जैन, मारवाडी यांचा देशात लोकसंख्येत एक टक्का आहे; मात्र देशाच्या उत्पन्नात २२ टक्के वाटा आहे. जागतिक बँकेने ६५० कोटी खात्याला डिजिटल प्रशिक्षण देण्यासाठी दिले आहेत. विश्वकर्मा अंतर्गत प्रशिक्षण घेऊन व्यवसाय करा. योजनेंतर्गत तीन लाख रुपये देत आहोत. त्याला व्याज नाही. मुलींनी उद्योग व्यवसायांत पुढे यावे, असे आवाहन यावेळी मंत्री राणे यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.