Konkan Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी 'महायुती'चा उमेदवार कोण? नारायण राणे की किरण सामंत? उद्या फैसला
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि किरण सामंत हे महायुतीमधील भाजप-शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Constituency) निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. या मतदरसंघाचा दावेदार कोण, हे गुरुवारी (ता. २९) प्रसिद्ध होणाऱ्या महायुतीच्या पहिल्या यादीमध्ये स्पष्ट होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने विद्यमान खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) हेच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
आता प्रतीक्षा आहे ती महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची. या मतदारसंघासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भाजपकडून तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांच्या नावांची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय हालचालींना वेग येताना आहे.
विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी-रायगड या मतदारसंघाकडे विशेष लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचे आहे. कोकणातील जे लोक मुंबईला नोकरी, धंद्यानिमित्त राहतात त्यांची भूमिका या निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरते. कोकणातील या दोन महत्त्वाच्या निवडणुकांबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने (ठाकरे गटाचे) विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांनी संपर्काची पहिली फेरी पूर्ण केली आहे. आता विरोधी पक्षाकडून कोण उमेदवार असणार, असा प्रश्न आहे.
हा मतदारसंघ भाजपला सोडणार की शिवसेना स्वतः यावर उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांचे नाव समोर येत होते. त्यानंतर बांधकाममंत्री रवीद्र चव्हाण यांचे नाव आले, परंतु विनायक राऊत यांच्या समोर जठार प्रभावी ठरतील का? याचा अहवाल भाजपने वरिष्ठांकडे पाठविल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने नारायण राणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. शिवसेनादेखील या जागेसाठी आग्रही आहे. त्यांनी किरण सामंत यांची उमेदवारी निश्चित केली आहे. पहिल्या यादीमध्ये त्यांचे नाव असल्याची चर्चा आहे.
जमेच्या-पडत्या बाजूंचा होणार विचार
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि किरण सामंत हे महायुतीमधील भाजप-शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाची किती जमेची बाजू आहे आणि कोणाची किती पडती बाजू आहे, याचा तिन्ही पक्ष विचार करून ही उमेदवारी जाहीर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.