National Science Day
National Science Day esakal

National Science Day : '..तरच आपण विज्ञानाच्या मदतीने जगात अव्वल स्थान प्राप्त करू शकतो'

कोकणात विज्ञान शाखेत दरवर्षी हजारो मुले शिक्षण घेत असतात. | With the help of science, we can achieve the top position in the world...
Published on
Summary

स्वातंत्र्यानंतरच्या काळात विज्ञानाच्या मदतीने आपण केलेल्या प्रगतीचा मागोवा घेताना आपल्याला दिसून येईल की अन्नधान्य उत्पादनात आपल्या देशाला स्वयंपूर्णता लाभली आहे.

-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com

समय सारणी सातत्याने बदलत असते. कालखंड बदलत जातो तस तसे नवे बदल होत असतात व नवे शोध लागून त्याचे आविष्करणही पाहायला मिळत असते. गरज ही शोधाची जननी असते आणि हेच शोध विज्ञानाने शक्य होत असतात. उद्योजकीय भान असलेले उद्योजक उद्योग साकारताना विज्ञानाचा अभ्यास करून त्याचे उपयोजन प्रभावीपणे आपल्या उद्योगात दूरदृष्टीने करत असतात. कोकणात विज्ञान शाखेत दरवर्षी हजारो मुले शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांनी (Students) ज्ञान, विज्ञान व उद्योजकीय भान या त्रिसूत्रीची कास धरून उद्योजक होण्याचे ध्येय मनी धरावे म्हणून हा लेख.

आज २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day). या दिनाचे औचित्य साधून गेल्या सत्तर ,पंचाहत्तर वर्षांत सर्वच क्षेत्रांत सातत्यपूर्ण प्रगती करून अमृत काळात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊले टाकणाऱ्या आपल्या भारत देशाचे सर्वच जगात कौतुक का होत आ, याचाही आढावा या लेखातून करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही त्याने साध्य केलेल्या किर्तीमानांवर, शोधांवर, यशस्वीतेवर, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांवर, तंत्रज्ञान व विज्ञान यांच्या कामगिरीवर व घेतल्या गेलेल्या पेटंटवर अवलंबून असते. वैज्ञानिक प्रगती राष्ट्राला,व्यक्तीला विकासाकडे घेऊन जाणारी असू शकते.

National Science Day
Konkan Business : सतत कारणे देणाऱ्याचा उद्योग वाढत नसतो!

एका उच्चतम ध्येयाकडे घेऊन जाणारी व संपूर्ण राष्ट्राला सकारात्मक प्रेरणा देणारी अशी अभिमानाची गोष्टही ती ठरू शकते. आपल्या देशातले अभियंते, शास्त्रज्ञ, शिक्षक यांनी विज्ञानाची कास धरून गेल्या पंचाहत्तर वर्षांत देदीप्यमान कामगिरी करत राष्ट्राने बाळगलेले सर्वच क्षेत्रांत आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेलाआहे. स्वयंपूर्ण होण्याच्या ध्येयाकडे सकारात्मक व शाश्वत पद्धतीने वाटचाल आपण भारतीयांनी केलेली आहे. ही वाट मात्र आता उद्योजकीय प्रेरणेने निरंतर चालावी लागणार आहे त्यासाठी येणाऱ्या नव्या पिढीला विज्ञानाचे बाळकडू लहानपणीच पाजावे लागणार आहे, तरच आपण विज्ञानाच्या मदतीने जगात अव्वल स्थान प्राप्त करू शकतो.

National Science Day
भारतातील 'ही' पहिली बुलेट ट्रेन वाऱ्याशी करणार स्पर्धा; बंदुकीतील गोळीच्या वेगाचाही चुकवणार अंदाज!

१९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण त्यावेळी आपल्या राष्ट्रासमोर अनेक आवाहने होती, नुकतेच स्वातंत्र्य मिळाले असल्याने विविध गोष्टींसाठी आपली इतर देशांवर अवलंबिता होती. अन्नधान्य, उत्पादन, उद्योग, व्यापार, दळणवळण, संदेशवहन इत्यादी अनेक क्षेत्रांत आपली स्वतःची घडी नीट बसलेली नव्हती; पण आपणाकडे जागतिकस्तरावरील उच्च कोटीची विचारसरणी असलेले थोर शास्त्रज्ञ होते. अनादी कालापासून चालत आलेले ज्ञान, विज्ञानाचे काही लिखित, अलिखित सिद्धांत होते; पण ते फलद्रुप करण्यासाठीं असलेल्या माहितीवर विविध प्रयोग करून बघण्यासाठी लागणारा फारसा वेळ, पैसा व उद्योजकीय भान असलेले उद्योजक नव्हते.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात विज्ञानाच्या मदतीने आपण केलेल्या प्रगतीचा मागोवा घेताना आपल्याला दिसून येईल की अन्नधान्य उत्पादनात आपल्या देशाला स्वयंपूर्णता लाभली आहे, दूध उत्पादनात (Milk Products) दुग्ध क्रांतीनंतर आपण चांगली भरीव प्रगती सिद्ध करू शकलो आहोत, दळणवळणाच्या क्षेत्रात रस्ते वाहतुकीपासून ते हवाई वाहतुकीपर्यंत आपण चांगला पल्ला गाठला आहे, संदेशवहनाच्या क्षेत्रात परिवर्तनाचे विविध टप्पे पार करत आपण आता ४G, ५G स्मार्टफोन वापरापर्यंत आलो आहोत.

National Science Day
Devbagh Beach : 'लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात!'

आपली वस्त्रोद्योगातील प्रगती इतर प्रगत देशांनासुद्धा अचंबित करणारी ठरली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे तंत्रज्ञान आपण विकसित केले आहे. आपल्या पाणबुड्या, रडार जगात सर्व श्रेष्ठ आहेत. भूकंपाचा अवरोध करू शकतील, अशी घरे उच्चतंत्र ज्ञानाच्या मदतीने आपण बांधू शकत आहोत, तसेच अन्य आधुनिक बांधकामतंत्र आपण आपल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विकसित केलेले आहे. करमणूक क्षेत्रात ही आपण मोठी उंची गाठली आहे. ओ टी टी सारखे प्लॅटफॉर्म आपण विकसित केलेले आहेत. (पूर्वार्ध)

(उद्योग प्रेरणा प्रशिक्षक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.