Kavi Keshavsut
Kavi Keshavsutesakal

Kavi Keshavsut : कवी केशवसुतांचे मालगुंड 'पुस्तकांचे गाव' कधी बनणार? भिलारसह कोकणातील गावांना मिळालाय हा सन्मान

कवी केशवसुतांचे मालगुंड पुस्तकांचे गाव बनवण्यासाठी भाषा विकास विभागाकडून पाहणी केली होती.
Published on
Summary

मालगुंड गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

रत्नागिरी : ब्रिटनमधील ‘ऑन वे’च्या धर्तीवर कवी केशवसुतांचे (Kavi Keshavsut) मालगुंड आणि भिलार (महाबळेश्‍वर) ही दोन गावे पायलट प्रकल्प म्हणून पुस्तकांचे गाव बनविण्याचा विचार मराठी भाषा विभागाचे तत्कालीन मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यावेळी भिलारमध्ये प्रकल्प कार्यान्वित झाला आणि मालगुंडचे नाव मागे पडले.

त्यानंतरही मराठी भाषा (Marathi language) विभागाचे कक्ष अधिकाऱ्‍यांच्या पथकाने मालगुंडला (Malgund) भेट देऊन सकारात्मक अहवाल सादर केला होता, पण पुन्हा कुठेतरी माशी शिंकली आणि तो प्रस्ताव बारगळला. यंदाच्या मराठी राजभाषादिनीही मालगुंडवासीयांचे स्वप्न अपूर्णच राहिले असून, आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मराठीतील आद्य कवी केशवसुत यांचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये भाषा विकास मंत्रालयाची एक समिती मालगुंडला आली होती. त्या समितीने केशवसुत स्मारकांमध्ये कोमसाप पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेतली. प्राथमिक चाचपणीत ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Kavi Keshavsut
National Science Day : '..तरच आपण विज्ञानाच्या मदतीने जगात अव्वल स्थान प्राप्त करू शकतो'

प्रत्यक्ष भेटीवेळी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मालगुंड गावांमध्ये २२ ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल उभारण्याचे निश्‍चित केले होते. त्यामध्ये गावातील शाळा, ग्रामस्थांची घरे, हॉटेल्स यासह केशवसुत स्मारक ग्रंथालयासह सुमारे सोळा जणांचा समावेश आहे. त्या स्टॉलवर कादंबरी, कथा, कवितांचे दालन, चरित्रग्रंथ यासह वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात येणार होती. या निमित्ताने वाचन संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे स्थानिकांचे मत होते, परंतु सरकार बदलल्यानंतर प्रस्ताव मागे पडला आणि मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले गावाची निवड झाली.

Kavi Keshavsut
Konkan Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी 'महायुती'चा उमेदवार कोण? नारायण राणे की किरण सामंत? उद्या फैसला

कवी केशवसुतांचे मालगुंड पुस्तकांचे गाव बनवण्यासाठी भाषा विकास विभागाकडून पाहणी केली होती. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. तसे झाले तर पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच ग्रामस्थांनी पुस्तकांचे स्टॉल उभारण्यासाठी मोफत जागा देण्याचीही तयारी दर्शवली होती.

-गजानन पाटील, अध्यक्ष, केशवसुत स्मारक समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.