Union Minister Narayan Rane
Union Minister Narayan Rane esakal

Narayan Rane : नारायण राणेंच्या 'त्या' ट्विटमुळे उमेदवारीचा संभ्रम कायम; 'महायुती'त जागांसाठी रस्सीखेच सुरू

लोकसभा निवडणूक (LokSabha Election) लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
Published on
Summary

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून भाजपच या जागेवर निवडणूक लढणार आहे, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.

रत्नागिरी : केंद्रीय लघु सुक्ष्म आणि उद्यम मंत्री नाराणय राणे (Narayan Rane) यांच्या ट्वीटमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या (Ratnagiri-Sindhudurg LokSabha Constituency) उमेदवाराबाबत राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपच्या निरक्षकांच्या यादीत हा मतदारसंघ नसल्याने तो शिवसेनेला सोडल्याची चर्चा होती. त्यामुळे किरण सामंत यांचे नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा असताना राणे यांच्या ट्वीटने महायुतीमधील उमेदवार निश्चितीचा गोंधळ पुढे आला आहे.

लोकसभा निवडणूक (LokSabha Election) लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीच महायुतीच्या (Mahayuti) मित्रपक्षांमध्ये जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमधील मित्रपक्षांकडून अनेक जागांवर दावा केला जातोय. त्यामुळे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. असे असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एका ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Union Minister Narayan Rane
'सातारा लोकसभा' अजित पवारांकडं? उदयनराजेंनीही व्यक्त केली निवडणूक लढवण्याची इच्छा, संघर्ष होण्याची चिन्हे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून भाजपच या जागेवर निवडणूक लढणार आहे, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनीदेखील या मतदारसंघात लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्यांनी अनेकवेळा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे जाहीरपणे बोलूनही दाखवले आहे. सोशल मीडियावर त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याबाबत शुभेच्छांचा वर्षाव होत असताना नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Union Minister Narayan Rane
शाहू महाराजांनी लढण्याचा निर्णय घेतलाच, तर मलाही..; 2009 ची पुनरावृत्ती होणार सांगत काय म्हणाले मंडलिक?

नारायण राणे यांचे ट्विट

लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षांचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवत आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे, असे नारायण राणे यांनी ट्विट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.