Woman Businessman
Woman Businessmanesakal

महिला उद्योजकता अधिक व्यापक होण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकसनतेचा त्यात किती वाटा असू शकतो?

उद्योग साकारताना विविध कौशल्ये उद्योजकांना अंगी बाणवावी लागतात. त्यातूनच उद्योजकीय व्यक्तिमत्त्व घडत असतात.
Published on
Summary

उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास साध्य करायचा असल्यास विविध जीवनकौशल्ये आत्मसात करण्याला तरणोपाय नसतो.

-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com

व्यक्तिमत्त्व विकसनशीलतेमुळे व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बदलते. विकसित व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व्यक्ती सकारात्मक विचार करून आपल्या बरोबरीने आणखीन काही व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास वचनबद्ध व कृतिशील होतात. ८ मार्च, महिला दिनानिमित्त महिला उद्योजकता (Woman Businessman) अधिक व्यापक होण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकसनतेचा त्यात किती मोठा वाटा असू शकतो, याची चाचपणी करणारा हा आजचा लेख.

वाजवी धोके पत्करून स्वतःच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक (Financial) फायद्यासाठी योग्य संधी लक्षात घेऊन व आपल्या व्यवहारज्ञानावर, कौशल्यांवर, प्रयत्नांवर अवलंबून सर्व संसाधने एकत्रित करून नियोजन व नेतृत्वगुणांच्या साहाय्याने जो स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करू शकतो अशा व्यक्तीला आपल्याला उद्योजक म्हणता येऊ शकते. उद्योजक होण्यासाठी कोणताही लिंगभेद असत नाही. उद्योग साकारताना विविध कौशल्ये उद्योजकांना अंगी बाणवावी लागतात. त्यातूनच उद्योजकीय व्यक्तिमत्त्व घडत असतात. व्यक्तिमत्त्व विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आत्मविश्वास व वाजवी उद्यमी साहस या जोरावर पुरुष उद्योजकांप्रमाणेच महिला उद्योजकही आपले उद्यम सुरू करण्याचा प्रयत्न करतात.

Woman Businessman
जैन, बौद्ध, हिंदू अशा तिन्ही धर्माच्या मूर्ती 'या' मंदिरात दिसतात; कोणतं आहे मंदिर आणि इथं कसं जाल?

कोकणात (Konkan) सहकार तत्त्व रुजले नसले तरी बचतगटांचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झालेले असल्याने बचतगट बांधणी प्रक्रियेतून महिलांमध्ये उद्योजकता या विषयी रुची उत्पन्न होत असल्याचे दिसून येते. महिला बचतगटांमधील वावर, उपस्थिती व त्यातून मिळणारे मार्गदर्शन यांमुळे एक उद्योजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्या तयार होत असतात. उद्यमीता म्हणजे सृजनक्षमता हे या महिला उद्योगिनींना कळून येते आणि खरे पाहता हीच सृजनात्मकता महिला उद्यमींना उद्योजकतेच्या प्रवासात वरदानही ठरत असते. मनाच्या निग्रहाने, एका ध्येयाने प्रेरित होऊन महिला उद्योजिका स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे उद्यम सुरू करायचे धाडस दाखवतात. काही स्वतःचा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी कष्टही घेतात; पण उद्योग म्हणावा तसा नावारूपाला न आल्याने खचूनही जातात.

एखादा उद्योग, व्यवसाय नुसता सुरू करून भागत नाही तर तो यशस्वीपणे चालवण्यासाठी लागणाऱ्या क्षमता, कौशल्ये सातत्याने आत्मसात करण्याकडे लक्ष देऊन व्यक्तिमत्त्व विकसनशीलतेकडेही तेवढेच लक्ष द्यावे लागते, हे एकल स्वामित्व असणाऱ्या उद्योजिकांच्या हळूहळू लक्षात येते व त्यांना उद्योग चालवण्यातील आव्हाने समजायला लागतात. त्यांनाही आपली स्वतःची संघटन शक्ती असायला हवी होती, याची जाणीव निर्माण होऊ लागते. आत्मविश्वास उच्च दर्जाचा असेल; पण व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या अन्य पैलूंकडे योग्य लक्ष दिले गेले नसेल अशावेळी महिला उद्योजिका स्वत:चा उद्योग मोठा करायचा का? किंवा आधीप्रमाणेच बचतगटात सक्रिय राहायचे याबाबत त्यांच्या मनात द्विधा मन:स्थिती उत्पन्न होत असते.

Woman Businessman
Konkan Tourism : शेकडो प्रकारच्या जीवांना आसरा देऊन अंगाखांद्यावर खेळवणारा 'कोकण सडा'

या कारणे निर्णय प्रक्रियेत अडथळे येतात. यासाठी महिला भगिनींनी व्यक्तिमत्त्व विकासातले विविध सूक्ष्म पैलू लक्षात घ्यायला हवेत जेणेकरून त्यांना स्वतःची ध्येयं, स्वप्नं आपल्याला आपल्या उद्योजकीय प्रवासात कशी पूर्णत्वास आणता येतील, याचे ज्ञान होईल. महिला बचतगट म्हणजे एकत्र येण्याची पहिली पायरी तर महिला उद्योजकता म्हणजे स्वतःच्या नेतृत्वगुणांना योग्य न्याय देऊन महिला शक्ती एकत्र करून महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या व्यापक दृष्टिकोनातून उभे राहिलेले उद्यम. उद्यमशीलता व व्यक्तिमत्त्व विकसनशिलता या दोन्ही गोष्टींमुळे महिला उद्योजकता विकसित होण्यास मदत होते.

ते असे एक उद्यम होते, जे एका किंवा एकाहून जास्त महिलांनी महिलांचा समूह (संघटन) करून दीर्घकालीन ध्येयधोरणांची पूर्ती करण्यासाठी सुरू केलेलं उद्यम किंवा उपक्रम ठरते व त्यामुळे एक महिला उद्योजक म्हणून आत्मविश्वासाने वैयक्तीकरित्या आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने आपल्या उद्योगातून एकाचवेळी महिलांसाठी रोजगार निर्मितीची इच्छा पूर्णत्वास आणू शकतात. उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास साध्य करायचा असल्यास विविध जीवनकौशल्ये आत्मसात करण्याला तरणोपाय नसतो.

Woman Businessman
Brain Hemorrhage Symptoms : मेंदूत रक्तस्राव होण्याची कोणती आहेत कारणे? पेशंटवर काय होतो आघात?

स्वजागृती, समस्या निराकरण, कौशल्य, प्रभावी संवाद कौशल्य, निर्णयक्षमता, ताणतणावांचे समायोजन, आंतरव्यक्ती संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, जनसंपर्क वाढवण्यासाठीचे प्रयत्न, संघबांधणी, वेळेचे व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी, नियोजन कौशल्य, चिकाटी, नेतृत्वगुण विकसन, सादरीकरण कौशल्य, देहबोली अशांसारख्या सर्व कौशल्य व क्षमतांनी स्वतःला सिद्ध करत अन्य महिलांना प्रेरित करण्याची कला विकसित करून आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व बनवण्याकडे महिला उद्योगिनींनी कल दिल्यास त्या चांगल्या उद्योग प्रवर्तक ठरू शकतात. नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व असलेल्या उत्साही, प्रचंड आशावादी व चैतन्यदायी, सक्षम मानसिकतेच्या व आपल्या सहकारी महिलांना बरोबरीने घेऊन जाणाऱ्या महिला उद्योजिका प्रचंड ध्येयवादातून व प्रयत्नशीलतेतून महिला उद्यमिता यशस्वी करून दाखवू शकतात. कोकणात महिला उद्योगांना प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळाल्यास महिला कामगार नियुक्त होऊन शाश्वत रोजगाराच्या प्रश्नालाही योग्य उत्तर मिळेल, असे वाटते.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()