Dinu life Journey
Dinu life Journeyesakal

आयलीनला आयुष्यातून निपटून काढणं दिनूला कधीच जमलं नाही, तो तिला आयुष्यभर शोधत राहिला!

दिनू अधिकाधिक अबोल होत गेला. उरलेलं आयुष्य फक्त झपाटून सतत काम करण्यासाठी वाहून घेत राहिला.
Published on
Summary

दिनू आणि दिनूचं आयुष्य कोसळून पडलं. दिनू आजारी पडून अंथरूणावर दिसेना इतका कोसळून पडला.

-राजा बर्वे, चिपळूण

दिनू अधिकाधिक अबोल होत गेला. उरलेलं आयुष्य फक्त झपाटून सतत काम करण्यासाठी वाहून घेत राहिला. करकचून घट्ट बांधलेल्या केरसुण्यांनी जणू आपला भूतकाळ झटकून निपटून टाकत राहिला. झाप विणताना घातलेल्या पात्यांच्या तिरप्या घट्ट विणीत आपला भूतकाळ आणि भविष्य चिणून टाकत राहिला. त्याच्या आयुष्यात आलेल्या काही नाजूक आणि हळव्या कोमल क्षणांना जुन्या हिंदी (Hindi) द्वंदगीतांमध्ये तो शोधतोय, असं मला कायम वाटत राहात असे.

Dinu life Journey
Brain Hemorrhage Symptoms : मेंदूत रक्तस्राव होण्याची कोणती आहेत कारणे? पेशंटवर काय होतो आघात?

कधी कंटाळा आला की, मी सरळ दत्तू निमकरला फोन करतो आणि त्याचे वरवड्याचे घर गाठतो. त्याचं शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचे चौसोपी घर, समोर मांडव असलेले प्रशस्त अंगण, झोपाळा, बाजूच्या गोठ्यातून येणारा गाईंच्या (Cow) गळ्यातील घुंगुरांचा आवाज, शेणामुताचा संमिश्र वास, घरामागे असलेली दीड एकरची नारळ पोफळीची विस्तीर्ण हिरवीगार बाग, विहीर, विहिरीवरचा पायरहाट हे सारं डोळ्यात साठवत एक-दोन दिवस दत्तूसोबतच्या गप्पा आणि परत असा वर्षातून एक-दोनदातरी कार्यक्रम ठरलेला असतोच असतो. तिथेच प्रथम माझी आणि दिनूकाकाची भेट झाली.

मी पहिल्यांदा दत्तूकडे गेलो तेव्हा मला अंगणातल्या मांडवाच्या मेढीला टेकून बसलेली एक व्यक्ती झपाझप नारळाचे झाप विणताना दिसली.. निमगोरा, वय साधारण पंचेचाळिशीच्या आसपास, उभा चेहरा, पाणीदार डोळे, आखूड धुवट पंचा, एक पाय उभा मोडलेला, एक मांडी घातलेला, वाढलेले केस उलटे पूर्ण मागे फिरवून मानेजवळ त्याची गाठ मारलेली, काही ठिकाणी रूपेरी झालेली लांब दाढी, खांद्यावर गमशा, समोर झापांचा भारा, केरसुण्या बांधायचे हीर, बांधायचं सामान आणि त्याच्या कडेला सतत विविध भारतीवरची जुनी हिंदी गाणी (Hindi Songs) गाणारा फिलिप्सचा दोन बँडचा ट्रान्झिस्टर अशी ही व्यक्ती कोण असावी? असा मी विचार करत होतो.

Dinu life Journey
महिला उद्योजकता अधिक व्यापक होण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकसनतेचा त्यात किती वाटा असू शकतो?

दत्तूचा कोणी गडी असावा, असे मला वाटेना. तो सुशिक्षित असावा, हे जाणवत होतं आणि समोर अखंड गाणारा ट्रान्झिस्टर? तो मात्र मला हा गडी असावास, असे सांगेना. मी दत्तूला विचारलं तेव्हा त्याने ''हा माझा धाकटा काका आहे'', इतकंच सांगितलं. त्यानंतर मी अनेकवेळा दत्तूकडे गेलो त्या प्रत्येकवेळी मला दिनूकाकाच्या वागण्यात एक गूढ पण तरीही अगतिक दीनवाणा भाव जाणवत राही. कधी संध्याकाळी उशिरा बाहेर पडून मोठी देवराई असलेल्या गावाबाहेरच्या ग्रामदेवीच्या देवळात एकटाच तासनतास बसून राही. गावात कोणाच्या लग्नसमारंभाला (Wedding Ceremony) दिनू कधीही जात नसे. लग्नाची वरात घरावरून कधी निघाली तर हा घरातल्या अंधाऱ्या खोलीत ती वरात जाईपर्यंत स्वतःला कोंडून घेई. एक-दोनदा मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला; पण तो जुजबी एक-दोन वाक्ये बोलून गप्प व्हायचा.

एक दिवस मी दत्तूला त्याच्या या स्वभावाबद्दल विचारले आणि दत्तूने जे सांगितले ते ऐकून हतबुद्ध झालो. दिनू हुषार, मॅट्रिकला बोर्डात आलेला.. अकरावीनंतर मुंबई गाठली, रूपारेल कॉलेजमध्ये डिग्री घेतली आणि मंत्रालयात स्टेनो म्हणून लागला. वक्तशीर, सालस दिनूने ऑफिसमध्ये लवकरच नाव कमावले. तिथेच ऑफिसमधली आयलीन खंबाटा दिनूच्या प्रेमात पडली. दररोज ऑफिस सुटल्यावर गेटवेला जाऊन तासनतास दोघं एकमेकांच्या सहवासात वेळ घालवत. अखेर श्रीमंत पारशी आयलीनच्या घरी बातमी पोचली आणि तिच्या घरच्यांनी तिला दूर नातेवाईकांकडे दिल्लीला पाठवून दिलं आणि पुढे तिकडेच लग्नही लावून दिलं.

Dinu life Journey
बुरोंडीतील जेटीचा प्रस्ताव 48 वर्षे बासनात; मच्छीमारांचं मोठं नुकसान, मासळी विक्रीसाठी हर्णै बंदराचा पर्याय

दिनू आणि दिनूचं आयुष्य कोसळून पडलं. दिनू आजारी पडून अंथरूणावर दिसेना इतका कोसळून पडला. दत्तूच्या बाबांनी त्याला नोकरीचा राजीनामा देऊन घरी आणलं आणि दिनू अंतर्बाह्य बदलला. अबोल झाला कायमचा. अगदी आजपर्यंत. दिनूच्या उमलणाऱ्या आयुष्यात घुसमटून गेलेले हे वादळ दिनूला अंतर्बाह्य ढवळून गेले. दत्तूकडून समजलेल्या या गोष्टीने मलाच अंतर्मुख केलं. आयलीनला आयुष्यातून निपटून काढणं दिनूला कधीच जमलं नाही. इथे-तिथे सगळीकडे दिनू तिला आयुष्यभर शोधत राहिलाय..अगदी आजपर्यंत..

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()