Vashishti River
Vashishti Riveresakal

Koyna Dam : कोयनेचे पाणी थांबले, तर पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होईल; वाशिष्ठीचे पात्रही कोरडे

कोयना धरणातील (Koyna Dam) पाण्यावर वीजनिर्मिती झाल्यानंतर हे पाणी वाशिष्ठीच्या नदीपात्रात सोडले जाते.
Published on
Summary

मार्चमध्ये कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यानंतर वाशिष्ठीचे पात्र कोरडे पडते. त्या वेळी खेर्डीतील जॅकवेलमधून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो.

चिपळूण : कोयना प्रकल्पातील (Koyna Project) वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यामुळे वाशिष्ठी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे निम्म्या चिपळूण शहराला गोवळकोट खाडीच्या मचूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीपात्रात (Vashishti River) येणारे कोयनेचे अवजल कायमस्वरूपी बंद झाले तर चिपळूण शहराच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Vashishti River
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला पूर्ण ताकदीने तीव्र विरोध करणार; बैठकीत शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोयना धरणातील (Koyna Dam) पाण्यावर वीजनिर्मिती झाल्यानंतर हे पाणी वाशिष्ठीच्या नदीपात्रात सोडले जाते. या पाण्यावर चिपळूण शहर, उपनगर आणि एमआयडीसीतील कारखान्यांची गरज भागवली जाते. वाशिष्ठी नदीतील पाणी उचलण्यासाठी चिपळूण पालिकेने खेर्डी आणि गोवळकोट येथे जॅकवेल बांधले आहेत. खेर्डीतील जॅकवेलमधून येणाऱ्या पाण्याचा निम्म्या भागाला पुरवठा होतो.

गोवळकोट जॅकवेलमधून येणाऱ्या पाण्यातून निम्म्या शहराची तहान भागवली जाते. मार्चमध्ये कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यानंतर वाशिष्ठीचे पात्र कोरडे पडते. त्या वेळी खेर्डीतील जॅकवेलमधून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो; मात्र गोवळकोट येथील जॅकवेलमध्ये खाडीचे मचूळ पाणी येत असल्यामुळे तेच मचूळ पाणी नागरिकांना प्यावे लागते. मचूळ पाण्याच्या समस्येवर आठ दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे. वाशिष्ठी नदीला पाणीच नसेल तर मचूळ पाण्याच्या प्रश्नावर पालिका मार्ग कसा काढणार, याकडे लक्ष आहे.

Vashishti River
Mhaisal Yojana : कृष्णा नदीवर कनवाड-म्हैसाळदरम्यान उभारण्यात येणार धरण; शिरोळसह सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा

कोयनेचे महत्त्व अधोरेखित

पावसाळ्यात वाशिष्ठी नदीला पूर आला, तर कोयनेच्या पाण्यावर खापर फोडले जाते. कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे चिपळूण शहरात पाणी भरल्याचा आरोप केला जातो. वास्तविक कोयनेच्या पाण्यावरच शहरातील नागरिकांना उपनगरातील ग्रामस्थांना आणि खेर्डी, खडपोली, लोटेतील कारखानदारांना पाणी पुरवले जाते. एमआयडीसीतील कारखानदार आणि नागरिकांना वाशिष्ठीचे पाणी वगळता इतर पर्याय नाही. त्यामुळे वाशिष्ठेच्या पात्रात येणाऱ्या कोयनेच्या पाण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Vashishti River
बुरोंडीतील जेटीचा प्रस्ताव 48 वर्षे बासनात; मच्छीमारांचं मोठं नुकसान, मासळी विक्रीसाठी हर्णै बंदराचा पर्याय

जलसंपदा विभागाशी आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. नदीपात्रात किमान चार तास पाणी असावे, अशी सूचना आम्ही त्यांना केली आहे. गोवळकोट जॅकवेलला जोडलेली पाईपलाईन खेर्डी जॅकवेलला जोडली, तर सर्वच भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नदीपात्रात पाणी असणे हे गरजेचे आहे. कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी पात्रात पाणी सोडण्याची मागणी आम्ही जलसंपदा विभागाकडे केली आहे.

-नागेश पेठे, पाणीपुरवठा विभाग, चिपळूण पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()