समाधी पूजनाने पूर्वजांचे स्मरण

समाधी पूजनाने पूर्वजांचे स्मरण

Published on

५ (टुडे पान १ साठी, अॅंकर )


-rat७p१६.jpg- ः
२४M६९६५९
पालेकोंड (ता. मंडणगड) : पूर्वजांच्या समाधी पूजनाची परंपरा भक्तीभावात श्रद्धेने माळी कुटुंबीय जपत आहेत.
----------
महाशिवरात्र विशेष---लोगो

समाधी पूजनाने पूर्वजांचे स्मरण

अनोखी परंपरा ; एकत्रित कुटुंबाचे महत्व अधोरेखित, नव्या पिढीला वाडवडिलांची जाणीव

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः महाशिवरात्रीला कोकणात ग्रामीण भागात पूर्वजांच्या समाधी पूजनाची परंपरा अजूनही तितक्याच श्रद्धेने, आस्थेने जोपासली जाते. शेकडो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांच्या समाधीस्थळांची साफसफाई करून त्यांची पूजा केली जाते. त्या निमित्त कुटुंबातील सदस्य एकत्र येत आपल्या नातेवाईकांच्या चांगल्या वाईट, सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा देतात. समाधीवरील प्रतिकात्मक पाषाणाकडे पाहून घरातील ज्येष्ठ मोठ्या आस्थेने त्यांचा जीवनपट सांगतात. या प्रसंगी कुटुंबातील तीन-चार पिढ्या एकत्र येत असल्याने कालबाह्य ठरत चाललेला एकत्रित भावनिक कुटुंब उत्सव अबाधित राहिला आहे.
घरातील किंवा कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अस्थी आणून त्यावर समाधी बांधली जाते. यातून आपल्या प्रियजनांचे अस्तित्व असल्याची भावना जोपासण्यात येते. जयंती, पुण्यतिथी आणि महाशिवरात्रीला या समाधीचे फार महत्व मानले जाते. महाशिवरात्रीला कुलदैवताच्या पूजनाने याची सुरवात होते. त्यानंतर पूजनाचे ताट आणि घरी बनवलेले पदार्थ घेऊन घरातील सर्व मंडळी समाधीस्थळी जातात. सर्वप्रथम समाधीवर वाढलेले गवत, झाडी, पालापाचोळा साफ करून त्या पाण्याने स्वच्छ धुण्यात येतात. शेणाने सारवण काढली जातात. रांगोळी, कणा काढून सुशोभित केले जाते. त्या काळी बांधलेल्या समाधी पाहिल्यानंतर त्यातील कलात्मकता दिसून येते. समाधीवर प्रत्येकाची आठवण म्हणून नक्षी दिलेले पाषाण साफ करून समोर मोकळ्या जागेत महिला चुन्याची रांगोळी काढतात. त्यावर दिवा, अगरबत्ती, फुले, हार ठेवून हळदकुंकू वाहून चारही टोकांवर झेंडे रोवले जातात. पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने समाधीस्थळावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. घरातून बनवून आणलेले त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्याच्या स्वरूपात वाढून प्रदक्षिणा घालून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.
-------------
कोट
या प्रथा परंपरेमुळे कुटुंबातील आपले पूर्वज आठवणीतून तरुण पिढीला उलगडतात. त्यांचे कर्तृत्व जाणून त्यातून प्रोत्साहन मिळते. आपणही आपल्या पूर्वजांचा आदर्श ठेवून जगण्याची इच्छा निर्माण होते. विभक्त कुटुंबपद्धतीत हा एक दिवस एकत्रित कुटुंबाचे महत्व अधोरेखित करतो. त्यातून स्नेहभाव, प्रेम, आपुलकी वाढण्यास हातभार लागतो.

- सहदेव माळी
-----
कोट
पूर्वजांचे स्मरण करून देणारा समाधी पूजन ही प्रथा संस्कृती परंपरेशी निगडित आहे. कुटुंबात सलोखा आणि प्रेम अबाधित ठेवणारा आहे. समाधी पूजनाने पूर्वजांचे अधुरे संकल्प, स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्याचे बळ देणारा आहे. कुटुंबासाठी त्यांनी दिलेले योगदानाचे स्मरण व्हावे व हा वारसा पुढील पिढीला मिळावा, अशा भावना याच्याशी निगडित आहेत.

-अॅड. ज्ञानेश्वर मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.