Kokan Railway News
Kokan Railway Newssakal

Kokan Railway: कोकणात होळी उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या!

उधना जंक्शन ते मंगळुरू आणि सुरत ते करमाळी या मार्गावर या गाड्या २० ते २५ मार्च या कालावधीसाठी धावणार आहेत.
Published on

Kokan News: कोकणात मोठ्या प्रमाणात होळी उत्सव साजरा होतो. यासाठी कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

उधना जंक्शन ते मंगळुरू आणि सुरत ते करमाळी या मार्गावर या गाड्या २० ते २५ मार्च या कालावधीसाठी धावणार आहेत. (kokan Railway News)

Kokan Railway News
Kokan News: ''संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून हटवले पाहिजे''

या मार्गावर गाडी क्र. ०९०५७ उधना जं. ते मंगळुरू ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी उधना जंक्शन येथून बुधवार, रविवारी २० आणि २४ मार्च रोजी सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार, सोमवारी २१ आणि २५ मार्च रोजी रात्री १० वाजता सुटेल ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड,

वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशनवर थांबेल. सुरत ते करमाळी आणि परत सुरत ही विशेष गाडी धावणार आहे.(kokan railway celebration)

Kokan Railway News
Kokan News: आधी लोकसभेची लढाई जिंकू, मग त्या चाळीस गद्दारांना मतपेटीतून गाडू; कोकणात शिवसेना आक्रमक!

गाडी क्र. ०९१९३ सुरत येथून २१ आणि २८ मार्च रोजी सायंकाळी ७ .५० ला सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०९१९४ करमाळी येथून शुक्रवारी २२ आणि २९ मार्च रोजी करमाळी दुपारी २.४५ ला सुटेल.

ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्टेशनवर थांबेल.(railway stations on kokan railway)

Kokan Railway News
Kokan Railway : कोकण रेल्वेने गेल्या तीन महिन्यात ५ कोटी ६० लाख ९९ हजार रुपयांचा केला दंड वसूल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.