Faster Boats Harnai Port Eknath Shinde
Faster Boats Harnai Port Eknath Shindeesakal

Harnai Port : जोरदार वाऱ्यामुळं परराज्यातील नौका हर्णै बंदरात; मलपी फास्टर नौकांवर मुख्यमंत्री शिंदे करणार कारवाई?

गेले आठ ते दहा दिवस उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
Published on
Summary

शासन नियमानुसार पर्ससीननेट नौकांना १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंतच मासेमारी करण्याची परवानगी असते. हर्णै बंदरामध्ये परराज्यातील अनेक नौका मासळी घेऊन आसऱ्याला आल्या आहेत.

हर्णै : जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे मलपी फास्टर नौकांनी सुरक्षेसाठी हर्णै बंदराचा (Harnai Port) आधार घेतला आहे. परराज्यातील नौका (Boat) आपल्या हद्दीत येऊन मासेमारी करत आहेत, याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे.

गेले आठ ते दहा दिवस उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. येथील मच्छीमार प्रचंड हताश झाले आहेत. राजरोसपणे हर्णै बंदरासमोरील समुद्रामध्ये साधारण ४ ते ५ नॉटिकल मैलावर परराज्यातील मलपींच्या फास्टर नौका (Faster Boats) बेकायदेशीरपणे मासेमारी करत असतात. यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासळीच मिळत नाही व त्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

Faster Boats Harnai Port Eknath Shinde
Dapoli Temperature : चौथ्यांदा दापोलीचा पारा 8.5 अंशांवर; मच्छीमारीलाही लागला ब्रेक, यावर्षीचे नीचांकी तापमान

याबाबत अनेक वर्षे येथील मच्छीमारांनी आंदोलने, मोर्चे काढले. त्याचा काहीही फरक आजपर्यंत शासकीय यंत्रणेवर पडलेला नाही. मासेमारी करणाऱ्या त्या नौकांवर ठोस कारवाई झालेली नाही. मागील आठ दिवसांपूर्वीही अनेक पर्ससीननेट नौका हर्णै बंदरात येऊन आसऱ्याला उभ्या होत्या. शासनाच्या नियमाप्रमाणे पर्ससीननेट नौकांची मासेमारी ३१ डिसेंबरपर्यंत बंद आहे, तर त्या नौका समुद्रात मासेमारी कोणत्या नियमाने करतात. शुक्रवारी (ता. ८) संध्याकाळीही उत्तरेकडील वारे जोरदार वाहू लागल्यामुळे सर्व नौकांनी हर्णै बंदराचा आसरा घेतला होता.

Faster Boats Harnai Port Eknath Shinde
Konkan : खोदकाम सुरू असताना पडेल गावात सापडली प्राचीन मूर्ती; विष्णूची मूर्ती असल्याचा इतिहास अभ्यासकांचा अंदाज

शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हर्णै येथील जेटीच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री मच्छीमारांच्या या समस्येकडे लक्ष देतील आणि ठोस उपाययोजना करण्यासाठी आदेश देतील, अशी अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.

Faster Boats Harnai Port Eknath Shinde
Shaktipeeth Highway : मुश्रीफांसमोरच शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; सामूहिक आत्महत्येचा दिला इशारा

शासन नियमानुसार पर्ससीननेट नौकांना १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंतच मासेमारी करण्याची परवानगी असते. हर्णै बंदरामध्ये परराज्यातील अनेक नौका मासळी घेऊन आसऱ्याला आल्या आहेत. शासन त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. या आमच्या समस्येकडे लक्ष द्यावे, तरच पारंपरिक मच्छीमार जगेल.

-हेमंत चोगले, मच्छीमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.