Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal

Deepak Kesarkar : सरकार 'काजू बी'ला 135 रुपये दर देणार; मंत्री केसरकरांच्या 'या' धोरणाला बागायतदारांचा तीव्र विरोध

शासनाने काजू बी (Cashew) मंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी धोरण स्वीकारले आहे.
Published on
Summary

काजू बी खरेदी करण्याबाबत शासनाने धोरण स्वीकारले असून काजू मंडळाच्या माध्यमातून काजू बी खरेदी करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे.

सावंतवाडी : शासनाने काजू बी (Cashew) मंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी धोरण स्वीकारले असून प्रतिकिलो १३५ रुपये दर दिला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी काजू बागायतदार शेतकऱ्यांना (Farmers) सांगितले. बागायतदारांनी प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी करून या धोरणाला विरोध दर्शवला.

सावंतवाडी, दोडामार्ग बागायतदार संघ आणि जिल्ह्यातील काजू बागायतदार बैठकीत विजय सावंत, डॉ. एम. बी. दळवी, विकास म्हाडगूत, प्रकाश वालावलकर, मधुकर देसाई, आदर्श मोरजकर, नाना होडावडेकर, बाळा नाईक, विजय प्रभू, नारायण गावडे, आकाश नर्सुले, प्रकाश मराठे, प्रवीण देसाई आदी बागायतदार येथील पालिकेच्या इंदिरा गांधी संकुलामध्ये उपस्थित होते.

Deepak Kesarkar
प्रतीक पाटील लोकसभा लढविणार? जयंत पाटलांनी राजू शेट्टींबाबत व्यक्त केली भीती; म्हणाले, प्रतीक यांना उतरवण्याचा..

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘काजू बी खरेदी करण्याबाबत शासनाने धोरण स्वीकारले असून काजू मंडळाच्या माध्यमातून काजू बी खरेदी करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. स्वतंत्र काजू मंडळाच्या माध्यमातून काजू खरेदी करण्याचे धोरण आहे. हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे जाईल. काजू बोर्डाने काजू बी चा दर प्रति किलो १३५ रुपये मान्य केला आहे. काजू बी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदीचा निर्णयही झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत यापेक्षा कमी दराने काजू खरेदी केली जाणार नाही. भविष्यात दर वाढेल. काजू पिकाबाबत पंचनामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत म्हणून मी प्रयत्न करणार आहे.’’

Deepak Kesarkar
Sangli Loksabha : कोयनेच्या पाण्यावरून होणार रणकंदन; लोकसभेच्या फडात पाण्याचं राजकारण पेटणार, नेते आक्रमक

यावेळी वालावलकर, देसाई यांनी १३५ रुपये दर दिला, तर त्यावर भाताप्रमाणे बोनस द्यावा. तो १५ रुपये प्रतिकिलो असावा, असे मत मांडले. अन्य शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोगाचे धोरण स्वीकारून काजू बी ला प्रतिकिलो दोनशे रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी केली.

Deepak Kesarkar
शेतकऱ्याची कमाल! राजापुरातील मुंडगा, सर्वट भातबियाणाला पेटंट; 50 वर्षांपासून करताहेत पिकाचा वापर

बागायतदार प्रकाश राणे म्हणाले, ‘‘काजू आयात शुल्क वाढवावे. ते कमी केल्याने परदेशातील काजू येत आहे. त्यामुळे बागायतदारांना मोठा फटका बसत आहे. कृषी विद्यापीठाच्या धोरणानुसार आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार प्रतिकिलो दोनशे रुपये हमीभाव मिळावा आणि आयात शुल्क वाढवावे.’’ श्रमिक शेतकरी संघा (कोल्हापूर)चे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे यांनी देखील काजूवरील शुल्क केंद्राने वाढवावे आणि काजू बी ला प्रतिकिलो दोनशे रुपये हमीभाव मिळावा म्हणूनच शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत, असे सांगितले.

ओल्या काजूगराला १२०० रुपये भाव

ओल्या काजूगराला मोठे मार्केट आहे. सुमारे बाराशे रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. काजूगर देखील टिन पॅकमध्ये विकला, तर आणखीन जास्त पैसे मिळतील, असे श्री. केसरकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.