Sushama Andhare
Sushama Andhareesakal

Sushama Andhare : आता दापोलीत सुषमा अंधारेंना पाय ठेऊ देणार नाही; शिंदे गटाच्या महिला आक्रमक, काय आहे कारण?

सुषमा अंधारे यांनी माजी मंत्री रामदास कदम कसे बाम लावून रडतात हे सांगत त्यांच्यावर व आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली.
Published on
Summary

'अंधारे पुन्हा दापोली येथे येऊन आमच्या नेत्यांना काही बोलल्यास आम्ही महिला आघाडी शांत बसणार नाही व त्यांना दापोलीत पाय टाकू देणार नाही.'

दाभोळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत दापोली येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) व आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली होती. त्याचा निषेध शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दापोली येथे केला.

सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दापोलीतील आझाद मैदान येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी मंत्री रामदास कदम कसे बाम लावून रडतात हे सांगत त्यांच्यावर व आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली.

Sushama Andhare
Sangli Loksabha : शिवसेना 'सांगली'साठी अडली; काँग्रेसचे शर्थीचे प्रयत्न, आता मदार केंद्रीय नेतृत्वावर

ही टीका सहन न झाल्याने दापोली येथील शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने एकत्र येऊन अंधारे यांचा निषेध केला. यावेळी बोलताना दीप्ती निखार्गे म्हणाल्या, दापोली हा सुसंसकृत मतदारसंघ असून येथे खालच्या पातळीवर जाऊन कोणावर टीका केली जात नाही. मात्र शिवसेनेत येण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यावर टीका केली असताना त्यांना सन्मानाने पक्षात घेऊन त्यांना पक्षात प्रमुखपदही दिले आहे.

Sushama Andhare
Hatkanangle Loksabha : 'हातकणंगलेची जागा मी सहज जिंकू शकतो, पण..'; राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंकडे केली 'ही' मागणी

चारुता कामतेकर म्हणाल्या, अंधारे पुन्हा दापोली येथे येऊन आमच्या नेत्यांना काही बोलल्यास आम्ही महिला आघाडी शांत बसणार नाही व त्यांना दापोलीत पाय टाकू देणार नाही. या वेळी माजी नगराध्यक्ष रसिका पेठकर, माजी सभापती ममता शिंदे, नगरसेविका कृपा घाग, माजी नगरसेविका डॉ. शबनम मुकादम, कीर्ती परांजपे यांच्यासह महिला आघाडीच्या पदधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.