Chhatrapati Shivaji Maharaj : वाह, क्या बात है! खेडच्या तरुणानं केला तब्बल 800 शिवकालीन प्राचीन नाण्यांचा संग्रह
१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवराई नाण्यांची निर्मिती झाली. या कालावधीतील अनेक नाणी त्याने संग्रहित केलेली आहेत.
चिपळूण : शिवकालीन नाणी (Coins of Shivaji Maharaj period) संग्रहाचा छंद जोपासणाऱ्या खेड येथील गौरव शेखर लवेकर (Gaurav Shekhar Lovekar) याने गेल्या १० वर्षात सुमारे ८०० शिवकालीन नाणी संकलित केली आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवास करून त्याने या नाण्यांचा शोध घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्यभिषेकास साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मराठा साम्राजाचे चलन या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली.
या पुस्तकात सर्वोत्तम ४ डॉटेड शिवराईची नाण्यांची छायाचित्रे निवडली. या चार नाण्यांमध्ये तीन नाणी ही गौरवने संग्रहित केलेली आहेत. गौरव शेखर लवेकर यांचे आजोबा प्रसिद्ध मूर्तीकार. त्यांच्या पश्चात शेखर लवेकर हे सुवर्णालंकाराचा व्यवसाय सांभाळत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या घडणावळीमुळे लवेकर कुटुंबीयांच्या घरी विविध प्रकारची नाणी यायची. यातूनच गौरवला नाणी संग्रहाची आवड निर्माण झाली.
यातूनच त्याने २०१४ पासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नाणी संग्रह करण्यास सुरुवात केली. शिवकालीन, ब्रिटिश, मुघल, तसेच संस्थानिकांची नाणी त्याने संग्रहित केली आहेत. शिवकालीन नाणी संग्रह करण्याचा त्याला फार आवड आहे. यासाठी गेल्या १० वर्षांच्या कालावधीत पंढरपूर, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी प्रवास केला. पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरे, तीर्थक्षेत्रांना त्याने भेटी दिल्या. शिवकालीन प्राचीन इतिहासाचा त्याचा दांडगा अभ्यास आहे.
सातत्याने त्याचे हे वाचन सुरू असते. मुंबई कॉईन सोसायटीचा तो अध्यक्ष आहे. १८३० नंतरच्या ब्रिटिश काळातील नाण्यांचाही संग्रह त्याने जपला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकेला ३५० वर्षे पूर्ण झाली. शिवाय भारत देश अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून मराठा साम्राज्याचे चलन या कॉफीटेबल बुकची निर्मिती करण्यात आली.
शिवकालीन नाण्यांची लोकांना माहिती मिळावी. यासाठी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. दिल्ली येथे लाल किल्ल्यात दिवाणीखाणमध्ये त्याचे प्रकाशन झाले. या पुस्तकासाठी राज्यभरातून नामवंत तज्ज्ञ आणि नाणी संग्रहकांनी नाणी पाठवली होती. त्याने संकलित केलेल्या नाण्यांचे छायाचित्र मराठा साम्राज्याचे चलन पुस्तकात सहभागी झाल्याने त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.
राज्याभिषेकानंतर शिवराई नाण्यांची निर्मिती
१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवराई नाण्यांची निर्मिती झाली. या कालावधीतील अनेक नाणी त्याने संग्रहित केलेली आहेत. दुदांडी शिवराई, बिंदूमय रायगडी शिवराई (डॉटेड), हाफ डॉटेड शिवराई, तंजावर शिवराई, लेटर शिवराई आदींचा यात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.