Shimgotsav Festival
Shimgotsav Festivalesakal

Konkan Shimgotsav : गोवळकोट-पेठमाप 'शिमगोत्सव' हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक; जामा मस्‍जिदीला पालखी भेटीचा कार्यक्रम

कोकणातील पहिला शिमगोत्सव चिपळुणात सुरू होतो. कोकणात शिमगोत्सव सुमारे पाच ते पंधरा दिवस सुरू असतो.
Published on
Summary

चिपळूण शहरातील ग्रामदैवत जुना व नवा कालभैरव देवस्थानचा प्रसिद्ध शिमगोत्सव फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्रीपासून प्रारंभ होतो.

चिपळूण : चिपळूण (Chiplun) शहरातील गोवळकोट-पेठमाप येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानचा शिमगोत्सव (Shimgotsav Festival) यंदा २२ मार्च सुरू होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही या शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. गोवळकोट येथील जामा मस्‍जिदीला पालखी भेटीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला जातो.

Shimgotsav Festival
रांजणीच्या तरुणाची रोबोटिक शाळा; मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी मशीन लर्निंग, कोडिंगचं प्रशिक्षण

चौगुले कुटुंबीयांतर्फे मानाची पहिली आरती करून आरंभ होतो. कोकणातील पहिला शिमगोत्सव चिपळुणात सुरू होतो. कोकणात शिमगोत्सव सुमारे पाच ते पंधरा दिवस सुरू असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी-त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा (Holi Festival) मुख्य दिवस साजरा केला जातो. ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रूपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणली जाते.

पालखी सजवून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. होळीच्या दिवशी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होतो. मात्र, गोविंदगडावरील श्री रेडजाईदेवी भेटीचा कार्यक्रम तितकाच प्रसिद्ध आहे. या शिमगोत्सवातील शेरणे कार्यक्रम तर भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. पेठमाप येथील वाशिष्ठी नदीकिनाऱ्यावरील मैदानात सुमारे तीन तास हा कार्यक्रम लाखो भाविकांच्या साक्षीने साजरा होतो.

Shimgotsav Festival
Sangli Grapes : सांगलीच्या द्राक्षांची चव 24 देशांनी चाखली; निर्यात तब्बल 14 हजार टनावर

फाल्गुन पौर्णिमेला कालभैरवाचा शिमगोत्सव

चिपळूण शहरातील ग्रामदैवत जुना व नवा कालभैरव देवस्थानचा प्रसिद्ध शिमगोत्सव फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्रीपासून प्रारंभ होतो. यावेळी कालभैरव देवस्थानची बहीण म्हणून ओळख असलेल्या शहराजवळील मिरजोळी येथील श्री देवी महालक्ष्मी देवस्थानचा शिमगोत्सव सुरू होतो. श्री जुना कालभैरव देवस्थान व श्री देवी महालक्ष्मी देवस्थानच्या पालखी भेटीचा कार्यक्रम तितकाच प्रसिद्ध आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय अनेक ठिकाणी सजावट, देखावे व पालखी मिरवणुकीचे आयोजन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.