Vashishti River
Vashishti Riveresakal

290 मीटर रुंद नदीपात्रात 'वाशिष्ठी'ला नेसवली साडी; एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत 'इतक्या' लागल्या साड्या

नदीच्या मध्यभागी काही क्षण थांबून नदीची खणानारळाने ओटी भरण्यात आली.
Published on
Summary

एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवण्यासाठी ६५ साड्या लागल्या. या साड्या एकमेकांना गाठवून लांब पट्टा तयार करण्यात आला होता.

गुहागर : वाशिष्ठी नदीचा (Vashishti River) उगमापासून संगमापर्यंतचा प्रवास जैवविविधतेने नटलेला आहे. या जादुई प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जलपर्यटन, जलमार्गाने वाहतूक, असे वेगवेगळे विषय जोडले पाहिजेत. त्यातून या नदीच्या तिरांवरील गावे आपण समृध्द करू शकतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाशिष्ठी नदीला साडी (Saree) नेसवण्याच्या कार्यक्रमाकडे आपण पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन कोकण अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले. ते परचुरी येथे बोलत होते.

गुहागर (Guhagar) तालुक्यातील परचुरीमध्ये पर्यटन व्यावसायिक सत्यवान देर्देकर, डॉ. समीधा देर्देकर, समर्थ देर्देकर यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम पार पडला.परचुरीमध्ये वाशिष्ठी नदीचे पात्र २९० मीटर रुंद आहे. एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवण्यासाठी ६५ साड्या लागल्या. या साड्या एकमेकांना गाठवून लांब पट्टा तयार करण्यात आला होता.

Vashishti River
Kolhapur Loksabha : शामराव माळी यांचं 'घोडा' चिन्ह अन् काँग्रेस उमेदवाराचा फक्त 165 मतांनी झाला पराभव

एका किनाऱ्यावरुन हा पट्टा एका बोटीद्वारे सोडवत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेण्यात आला. नदीच्या मध्यभागी काही क्षण थांबून नदीची खणानारळाने ओटी भरण्यात आली. या निमित्ताने १८ मार्च ते २१ मार्च असे चार दिवस हाऊस बोटीत भागवत पुराण व मत्स्यपुराणाचे पारायण करण्यात आले. जागतिक जल दिन असल्याने सकाळी नदीचे पूजन करण्यात आले.

त्यावेळी वाटेकर म्हणाले की, भारतातील शक्तीशाली दाभोळ बंदर अशी या नदीची ओळख आहे. महामारीच्या संकटात लॉकडाऊनमध्ये मोकळा श्र्वास घेण्याची उसंत मिळाल्यावर अवघ्या दोन महिन्यांत या नदीने आपले सौंदर्य, वैभव दाखवून दिले. वाशिष्ठी खोऱ्याचा पर्यावरणपूरक, पर्यटनाला अनुकूल असा विकास करण्यासाठी, या नदीला प्रदूषणमुक्त बनविण्यासाठी आपणच नदीसोबतचे नाते घट्ट करण्याची गरज आहे.

Vashishti River
Konkan Railway : कोकण रेल्वेवरील वाढीव गाड्या, थांबे मागण्यांना ब्रेक; वीर ते मंगळुरू दुहेरीकरण योजनाही कागदावरच!

३० पर्यटक उपस्थित

उपस्थित सर्वांनी नद्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त करण्यासाठी योगदान देण्याची शपथ घेतली. त्यानंतर वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. वाशिष्ठी नदीला नेसवलेल्या साड्या या कार्यक्रमानंतर प्रसाद म्हणून उपस्थित महिलांना देण्यात आल्या.या कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील ७०-८० ग्रामस्थ कराड, नाशिक, पुणे येथून ३० पर्यटक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.