Business
Businessesakal

Business : कोणताही 'उद्योग' घाईघाईने नाही तर संयमाने, सातत्याने करायचा असतो; यासाठी काय करावं लागेल?

उद्योग वाढण्यासाठी, ग्राहक मिळवण्यासाठी लागणारा नैसर्गिक वेळ हा उद्योजकाला आपल्या उद्योगासाठी द्यावाच लागतो.
Published on
Summary

उद्योग साकारत असताना साधारणपणे सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या आहेत तशाच घडतील असे उद्योजकाला वाटत असते; पण प्रत्यक्षात तसे कधीच घडत नाही.

-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com

उद्योजकता (Business) म्हणजे गतिमानता. वेग हे जरी खरे असले तरी सुरुवातीचा दिशाहीन अमर्यादित वेग हा उद्योजकतेची गाडी पाठीमागे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरू शकतो. उद्योग सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच तो नफा मिळवून देऊ शकेल, असे शक्य होत नाही. उद्योग वाढण्यासाठी, ग्राहक मिळवण्यासाठी लागणारा नैसर्गिक वेळ हा उद्योजकाला आपल्या उद्योगासाठी द्यावाच लागतो. त्यात उतावळेपणा करून चालत नाही.

उद्योग साकारत असताना साधारणपणे सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या आहेत तशाच घडतील असे उद्योजकाला वाटत असते; पण प्रत्यक्षात तसे कधीच घडत नाही. उद्योग हा संभाव्यता, संसाधनांची उपलब्धता, ग्राहकांची मानसिकता (Mentality) व उद्योजकाची निर्णयक्षमता तसेच त्या उद्योगाची ग्राहकांना असणारी गरज व आवश्यकता या घटकांवर अवलंबून असतो. उद्योजक हा वाजवी जोखीम घेणारा असेल तर ठीक नाहीतर अतिजोखीम घेण्याची वृत्ती व अतीची अनिवार्य नसलेली घाईच उद्योजकीय वाढीसाठी प्रतिकूल परिणाम देणारी ठरू शकते.

 Business
ग्राहक मिळवण्याची किंमत उद्योजकांनी लक्षात घ्यायला हवी, अन्यथा नुकसान होण्याची भीती!

अतिघाई संकटात नेणारी असते, अशा आशयाची एक म्हण आहे व दुर्दैवाने काही अतिउत्साही, आरंभशूर उद्योजकांच्या उद्योजकीय प्रवासाच्या अधोगतीला ती कशी पोषक ठरू शकते, हे आपण खालील उदाहरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.. उद्योग सुरू करताना ऐकीव माहितीवर किंवा सोशल मीडियावर पाहून एखादा मोठ्या गुंतवणुकीचा उद्योग सुरू करणे. घाईघाईत उद्योगाच्या जागेची निवड करणे व तिथेच उद्योग सुरू करण्याचा अट्टाहास करणे. उद्योग सुरू करताना कोणत्याही तज्ज्ञ मार्गदर्शकाची किंवा त्याच व्यवसायातील प्रथितयश उद्योजकांची साधी भेट ही न घेणे. कोणत्याही चुकीच्या माणसांवर, एजन्सीवर उद्योग उभा राहण्याची घाई असल्याने अंध विश्वास ठेवून ते म्हणतील त्या कागदपत्रांवर सही करणे.

 Business
Konkan News : चिपळूणचा शामू धनगर 'असा' बनला सह्याद्रीचा ढाण्या वाघ!

सुरवातीच्या टप्प्यात अपरिपक्वतेमुळे गडबडीत चुकीचे कर्ज व्यवहार किंवा अन्य कायदेशीर करार करून बसणे. भावनेच्या भरात गरज नसताना उद्योगाप्रती असलेली अधिकची आस्था, श्रद्धा चुकीच्या पद्धतीने अहंभावनेने जगाला दाखवून देण्यासाठी वाटेल तसा वारेमाप खर्च करणे. मलाच सर्व कळतं, हा चुकीचा दृष्टिकोन बाळगून घाईघाईत चुकीच्या वेळेला आपले उत्पादन बाजारपेठेत उतरवणे. मागणी तसा पुरवठा या नियमांकडे दुर्लक्ष करून घाईघाईने कच्चा माल स्वस्तात मिळतोय म्हणून प्रक्रिया करून अनिर्बंध पद्धतीने त्याची साठवणूक करणे. नीट विचार न करता नफा मिळवण्याच्या हेतूने घाईघाईने निर्णय घेऊन आपल्या मालाची, सेवेची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवणे.

 Business
Konkan Tourism : कोकणातील स्वप्नवत गाव 'अणसुरे'; गावात काय आहे खास?

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, उत्पादन जलदगतीने व्हावे यासाठी अनावश्यक ताण स्वतःच्या कारखान्यातील मनुष्यबळावर देणे. घाईघाईत उत्पादन घेऊन त्याच्या गुणवत्तेकडे कानाडोळा करणे. उद्योगप्रणाली स्थिरावू न देता उद्योगविस्तार सुरू करून एक उद्योजक म्हणून अधिकचा ताण स्वतःवर ओढवून घेणे. कच्चा माल कोणीतरी स्वस्तात देतोय असे समजून एकाच पुरवठादारावर विश्वास ठेवून भविष्यातील त्याच्या पर्यायाचा विचारही न करता त्याच्या मालाच्या गुणवत्तेचा प्रश्न निकाली न काढता सातत्याने स्वतःचे नुकसान करून घेणे. घाईगडबडीत विक्री जाळे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. उद्योजक म्हणून मिरवण्याचा चुकीच्या नादात नको तसा अवाजवी, उपयोगशून्य खर्च प्रमोशन व जाहिरातींवर करणे.

घाईगडबडीत किंवा कामाच्या ताणामुळे स्वत:च्या वैयक्तीक आयुष्याकडे दुर्लक्ष करणे किंवा स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करून घेणे. उद्योजक म्हणून गरजांचा नीट विचार न करता किंवा क्षमता न ओळखता स्वतःला झेपणार नाही एवढा व्याप वाढवणे. उद्योजक म्हणून सर्वच पातळ्यांवर अपयश येत असेल तरी दिखाव्यासाठी त्या उद्योगावर कर्जाचा बोजा वाढवत नेणे. कोणतीही तांत्रिक माहिती नसताना क्लिष्ट यंत्रसामुग्री विकत घेऊन ती शिकण्यात वेळ घालवणे.

 Business
Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

ना नफा ना तोटा बिंदू किंवा परतावा बिंदू यांचा विचार न करता पहिल्याच दिवसापासून नफा मिळवण्याच्या हेतूने चुकीच्या मानकांवर वस्तूच्या किंवा सेवेच्या किमतीचे निर्धारण करणे. फक्त पैसा हेच उद्दिष्ट असल्याने व्यावसायिक स्नेहसंबंध वाढवण्याकडे होणारे अनपेक्षित दुर्लक्ष. कोणतीही गोष्ट कार्यान्वित करण्यापूर्वी ती लिहून काढणे व पुन्हा वाचून, दुसऱ्यांचे विचार ऐकून आपले मत बनवणे. ग्राहक हितसंबंध बळकट करण्याकडे आवर्जून लक्ष देणे. उद्योग हा घाईघाईने नाही तर संयमाने, सातत्याने करायचा असतो हे शिकून घेणे.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()