Cycling
Cyclingesakal

कोकणात सायकलस्वार पर्यटक; टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्टस, जॅकेट्सनी सायकलिंगला आणला ग्लॅमरस लूक

सायकल्सच्या डिझाईन तसेच तंत्रज्ञानामुळे सायकलिंगमध्ये कमालीचा फरक पडला आहे.
Published on
Summary

नवोन्मेशी उद्योजकता आणि कल्पकतेच्या संगमातून फिटनेस तसेच सायकलप्रेमी पर्यटनाचा पर्याय म्हणून सायकल हब पर्यटनाला नवा आयाम देऊ शकेल.

-राजीव लिमये, कर्ले रत्नागिरी

मोठ्या शहरांबरोबर मध्यम शहरांमध्येही सर्व वयोगटातील स्त्रिया, पुरुष सायकलिंग करताना दिसतात. सायकलिंगसाठी (Cycling) आकर्षक कपडे, हॅन्डग्लोव्हज, हेल्मेटस, रिफ्लेक्टर्स, हेडलॅम्पस, टेल लाइटस् आदी अॅक्सेसरिजची रेलचेल झाली आहे. विविध रंगाचे टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्टस, जॅकेटस यांनी सायकलिंगला ग्लॅमरस लूक आणला आहे. शहरांमधून सायकल क्लब उत्तमप्रकारे कार्यरत आहेत. सायक्लोथॉन स्पर्धांमधून सायक्लिस्टना उत्तेजन मिळत आहे. अशा प्रकारे सर्वत्र सायक्लिस्टसची मांदियाळी झालेली असताना यामधून आता सायकलिंग पर्यटनाशी जोडले जात असून, या प्रकारच्या आवडीतून व्यावसायिक संधी निर्माण होताना स्पष्ट दिसत आहेत.

एकेकाळी मध्यमवर्गाकडून सायकलकडे गरजेचे वाहन म्हणून बघितले जायचे. ऐंशीच्या दशकानंतर स्कूटर मोटरसायकलची सहज वाढलेली उपलब्धता, समाजाचा उंचावलेला आर्थिक स्तर यामुळे मध्यमवर्ग सायकलकडून ऑटो वाहनांकडे सहजच वळला. कोरोनानंतरच्या (Corona) काळामध्ये फिटनेस आणि छंद म्हणून नियमित सायकलिंग करणाऱ्यांमध्ये खूपच वाढ झालेली आहे. यामध्ये सायक्लिस्ट मुली, महिलांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. सायकल्सच्या डिझाईन तसेच तंत्रज्ञानामुळे सायकलिंगमध्ये कमालीचा फरक पडला आहे. विविध आकर्षक रंगाच्या सायकली, गिअर, नॉनगिअर, माऊंटन, रोड हायब्रिड आदी प्रकारच्या सायकली सर्व कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. इलेक्ट्रिक सायकल्स तर खूपच पॉप्युलर होत आहेत.

Cycling
Konkan News : चिपळूणचा शामू धनगर 'असा' बनला सह्याद्रीचा ढाण्या वाघ!

पूर्वी आमच्या लहानपणी साठ-सत्तरच्या दशकात लहान मुले वडिलांच्या सायकली हाफ पॅडल मारत जोरात चालवत असताना ढोपरे-कोपरे दुखावून घ्यायची. त्यातही मोठी गंमत होती शिवाय गावांतून तासाच्या भाड्यावर सायकली मिळत असत. मग पंधरा-वीस पैशात सायकल तासभर चालवता यायची. आता याच पद्धतीने सायकल हबचा व्यवसाय होण्याची शक्यता दिसते आहे. पिंपरी-चिंचवड, वाकड या पुणे जिल्ह्यातील क्षेत्रात झूम प्रणालीकडून सायकली उपलब्ध केलेल्या पाहिल्या आहेत.

गोव्यातील पोर्वरीम भागात नगरकर यांनी सायकलिंग झेन्स या ब्रॅन्डखाली सर्व प्रकारच्या सायकली पर्यटकांसाठी उपलब्ध ठेवल्या आहेत. त्यांना संपर्क साधला असता अत्यंत मोकळेपणाने त्यांनी अनुभव सांगितले. सुरवातीला सहा सायकल्सपासून व्यवसाय सुरू केल्याचे सांगून व्यवसायासाठी सायकल सिलेक्शन किती महत्वाचे आहे याबद्दल अनुभवाचे बोल ऐकवले. गोव्यामध्ये टप्प्याटप्प्याने व्यवसाय वाढवणारे नगरकर मूळचे कोकणातीलच आहेत. सत्तर-ऐंशी सायकल्सचा ताफा बाळगणाऱ्या सायकलिंग झेन्समध्ये रोड सायकल, हायब्रिड सायकल, माउंटन सायकलबरोबरच इलेक्ट्रिक सायकलदेखील उपलब्ध असतात. सायकल निगराणीसाठी खास काळजी घेणे महत्वाचे असल्याचा सल्ला नगरकर देतात.

Cycling
Konkan Tourism : कोकणातील स्वप्नवत गाव 'अणसुरे'; गावात काय आहे खास?

दिल्ली, रशिया व्हिएतनाममधील पर्यटक सायकलिंगने गोवा फिरण्यास प्राधान्य देतात. हे सकारात्मक उदाहरण समजून घेताना कोकणातही अशा प्रकारे पर्यटकांसाठी सायकली पुरवण्याच्या व्यवसायाला संधी असल्याच्या कल्पनेला दुजोरा मिळतो. अर्थातच, आपल्याकडील स्थानिक परिस्थितीनुसार काही बदल विचारात घ्यावे लागतील, असे येथील सायकलप्रेमींशी बोलताना लक्षात येते.

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या रत्नागिरीतील हौशी सायक्लिस्ट श्रद्धा रहाटे सायकलिंग पर्यटन या विषयावर भरभरून मनापासून बोलतात. सायकल रेंट हबची संकल्पना त्या कोकणातील मध्यम शहरांसाठी उचलून धरताना त्यांच्या यशस्वीतेसाठी वेगवेगळ्या व्यावहारिक कल्पना सुचवतात. फक्त सायकल भाड्याने देणे एवढ्यापुरता व्यवासाय न करता सायकल हब संचालकांनी गटाने सायकल घेणाऱ्यांबरोबर मार्गदर्शनासाठी एक सायकलिस्ट गाईड द्यावा, अशी अभिनव कल्पना सुचवतात. त्यांच्या मते, त्या त्या शहराभोवती टुरिस्टना बघण्यायोग्य ठिकाणांचे रस्ते दाखवणे एवढेच नव्हे तर कोकणी संस्कृतीची, निसर्गाची, ओळख करून देणे नाश्ता-जेवणासाठी सुयोग्य ठिकाणे सांगणे, अशी दुहेरी-तिहेरी कामगिरी करतांनाच सायकल मेन्टेनन्स सपोर्ट दिला म्हणजे पर्यटकांच्या सायकलिस्ट ग्रुपचा आत्मविश्वास आणि सायकलिंगने स्थानिक प्रवास करण्याकडचा कल नक्कीच वाढेल.

Cycling
Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

खेडचे ज्येष्ठ सायक्लिस्ट विनायक वैद्य सायकल पर्यटन हब छोटा; परंतु यशस्वी उद्योग ठरेल, या विचाराचे पुरस्कर्ते आहेत. रत्नागिरीचे सायकल संघटक दर्शन जाधव सायकल हब उद्योगाला दुजोरा देताना सायकल वरून फिरण्याने मिळणाऱ्या आनंदाची गोडी लागलेला पर्यटक अशा सायकल भाड्याने देणारा हबचा आधार ठरू शकतो, अशा मताचे आहेत. यामुळे रोजगार उपलब्ध तर होईलच शिवाय भाड्याने दिलेल्या सायकलची सुरक्षिततासुद्धा राखली जाईल. सायकलबरोबर सुरक्षा साधने, हेल्मेट्स, हेड टेल लाइटस, प्रथमोपचार आदी बाबीसुद्धा महत्वाच्या आहेत. होळीच्या दिवसात अशा ग्रुपला सायकलवरून अगदी आतल्या रस्त्याने जाऊन देवळांमधून उभ्या राहणाऱ्या होळ्या घरोघर जाणाऱ्या पालख्या या संस्कृतीचा परिचय करून देणे पर्यटकांना आनंदीत करेल. प्रत्येक सीझनप्रमाणे वेगवेगळे पर्याय उभे रहातात.

Cycling
Business : कोणताही 'उद्योग' घाईघाईने नाही तर संयमाने, सातत्याने करायचा असतो; यासाठी काय करावं लागेल?

कल्पकतेतून वेगवेगळ्या सायकल ट्रेल्सचे पर्याय उभे रहातील. गणेशोत्सवात गावातून सायकलने जातान घरगुती सार्वजनिक उत्सवांचा आनंद पर्यटकांना मिळेल. पावसाळ्यातून धबधब्यांचे दर्शन करत तर पक्षीनिरीक्षणासाठी, कातळशिल्पे, कासव महोत्सव यासाठी तर सायकलिंग पर्यटन चांगला पर्याय ठरेल. एप्रिल-मेमध्ये आंब्यांच्या बागा, काजू इतर कोकणी फळे चाखायला सायक्लिस्टना नेता येईल. तुम्ही अनट्रॅव्हल नावाचा स्लो म्हणजेच संथ ट्रॅव्हलचा ब्लॉग पाहिला असेल तर अशा स्लो ट्रॅव्हलिंगच्या प्रवासशैलीला सायकल पर्यटनाचा पर्याय पर्यटकांना उत्तम ठरेल. टेंटसह सायकल म्हणजे सोनेपे सुहागा, अशा अनेक कल्पना प्रत्यक्षात आणता येतील. अशा कल्पनांसह सायकल हब उद्योगाचे महत्त्व प्रस्थापित करण्याच्या शक्यतेला सायकल शौकीन दुजोरा देतात.

झूम सायकलने जसे अॅप बनवून सायकल भाड्याने घेण्याचे वेगवेगळे पर्याय दिले आहेत त्याचा अभ्यास करून स्थानिक अॅप बनवण्याची शक्यता आता उपलब्ध आहे. अर्थात, तो जरा अधिक गुंतवणुकीचा आहे. वेगळ्या पद्धतीने विचारात करताना एखाद्या रिसॉर्टच्या आधारे सायकल हब उभा करणे, मोठ्या पर्यटनस्थळी रेस्टॉरंट्सनी आपला ब्रॅन्ड प्रस्थापित करत असा सायकल्सचा ताफा बाळगणे अशा शक्यतासुद्धा समोर येऊ शकतील. त्यासाठी नवोन्मेशी उद्योजकता आणि कल्पकतेच्या संगमातून फिटनेस तसेच सायकलप्रेमी पर्यटनाचा पर्याय म्हणून सायकल हब पर्यटनाला नवा आयाम देऊ शकेल.

(लेखक पर्यटनक्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.