Black Panther
Black Pantheresakal

Black Panther : तेरवण-मेढे जंगलात दुर्मिळ 'ब्लॅक पँथर'चं दर्शन, व्हिडिओ व्हायरल

दुर्मिळ ब्लॅक पँथरचे अस्तित्व दोडामार्गातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांत आढळल्याने जैवविविधता विपुल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Published on
Summary

याबाबत ‘वाईल्ड वन’च्या कर्मचाऱ्यांसाठी संपर्क साधला असता ही घटना खरी असल्याचे त्यांनी सांगितले.

दोडामार्ग : येथील तेरवण-मेढे जंगलात (Tervan-Medhe Forest) ‘वाईल्ड वन’ या नावाने प्राणी व पक्षी अभ्यासकांसाठी उभारलेल्या इमारतीच्या परिसरात ‘ब्लॅक पँथर’ (Black Panther) दृष्टीस पडला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत ‘वाईल्ड वन’च्या कर्मचाऱ्यांसाठी संपर्क साधला असता ही घटना खरी असल्याचे त्यांनी सांगितले.

Black Panther
हृदयद्रावक! वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यानंतरही जुळ्या बहिणींनी दिला पेपर; अश्रूंना रोखत दहावीच्या आव्हानाला दिलं तोंड

या दुर्मिळ ब्लॅक पँथरचे अस्तित्व दोडामार्गातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांत आढळल्याने जैवविविधता विपुल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दोडामार्गमधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तेरवण-मेढे येथील जंगलात दोन दिवसांपासून ‘ब्लॅक पँथर’चे दर्शन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

त्यासंदर्भात वन विभागाशी (Forest Department) संपर्क साधला. मात्र, याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा उलगडा करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी ‘वाईल्ड वन’च्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.

Black Panther
भारीच! शेतीकाम करणारा रोबोट अन् दिव्यांगांची स्मार्ट व्हीलचेअर; न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून महत्त्वपूर्ण संशोधन

यावेळी कर्मचाऱ्यांनी तो व्हिडीओ खरा असून, ब्लॅक पँथरचे येथे दर्शन झाल्याचे स्पष्ट सांगितले. वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर म्हणाले, ‘‘खासगी कर्मचाऱ्यांनी व्हिडीओत दिसणारा ब्लॅक पँथर तेथील जंगलातील असल्याचे सांगितले.’'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()