Sai Resort Case Kirit Somaiya
Sai Resort Case Kirit Somaiyaesakal

Kirit Somaiya : 'काळ्या पैशाचा वापर झाल्याने ED कडून अनिल परबांची चौकशी; ती केस न्यायप्रविष्ट, आता माझा रोल संपलाय'

अॅड. अनिल परब यांनीच बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या विरुद्धची कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया थांबलेली नाही.
Published on
Summary

'अनिल परब यांच्या दापोली, मुरूड येथील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी होत असलेल्या कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी आपण रत्नागिरीत आलो आहे.'

रत्नागिरी : अनिल परब (Anil Parab) खोटी माहिती देऊन स्वत:ला साई रिसॉर्ट प्रकरणातून (Sai Resort Case) वगळू पाहत आहेत. मात्र, त्यांच्या विरुद्धची कोणतीही कारवाई थांबलेली नाही. या अनधिकृत बांधकामासाठी काळ्या पैशाचा वापर झाल्याबद्दल ईडीकडून चौकशी सुरू आहे. प्राप्तीकर खात्याकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी थांबलेली नाही, असे प्रतिपादन भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले.

साई रिसॉर्ट सदानंद कदम (Sadanand Kadam) यांचे आहे, असे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि उद्धवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब सांगत असले तरी सीआरझेड प्रतिबंधित क्षेत्रात आधी परब यांनीच बांधकाम केले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ज्यांनी हे अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अनधिकृत बांधकाम पाडून टाकावे आणि नियमभंग होत असेल तर त्या त्या कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.

Sai Resort Case Kirit Somaiya
Kolhapur Lok Sabha : आक्षेपार्ह पोस्टद्वारे शाहू महाराजांची बदनामी; सतेज पाटलांची पोलिसांकडे तक्रार, असं काय आहे SMS मध्ये?

आता यानुसार प्रशासनाने कारवाई करावी, भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले अॅड. अनिल परब यांनीच बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या विरुद्धची कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया थांबलेली नाही. या बांधकामासाठी त्यांनी काळ्या पैशाचा वापर केला असून, त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. मी कुठेही थांबलेलो नाही. जेवढ्या केसेसे झाल्या आहेत त्या न्यायप्रविष्ट आहेत. त्यातील आता माझा रोल संपला आहे. पुढील कारवाई सुरूच राहणार आहे.

Sai Resort Case Kirit Somaiya
Sangli Loksabha: सांगलीत शिवसेना जिंकली, हरली पण वाढली नाही; 'मातोश्री'वरूनही मिळालं नाही बळ?

अनिल परब यांच्या दापोली, मुरूड येथील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी होत असलेल्या कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी आपण रत्नागिरीत आलो आहे. अनिल परब यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. ज्यांच्या जागेवर बांधकाम करण्यात आले त्या जागामालकांनेही जमीन विक्रीच्या कागदांवरील सह्या आपल्या नसल्याचे म्हटले आहे. या रिसॉर्टचे बांधकाम परब यांनीच केले आहे. हे न्यायालयासमोर त्यांनी आणि सध्या ज्यांच्याकडे रिसॉर्टचा ताबा आहे त्या सदानंद कदम यांनी मान्य केले आहे.

Sai Resort Case Kirit Somaiya
Kolhapur Lok Sabha : 'कौन है यह मुन्ना, कहाँसे आया..' शरद पवारांच्या एका वाक्यावरच फिरली 2004 ची निवडणूक

या आठवड्यात रिसॉर्ट पाडणार

आठवडाभरात साई रिसॉर्टचे पोर्च पाडण्यात आले आहे. उर्वरित भाग आपण स्वत:हून पाडतो, असे सदानंद कदम यांनी म्हटले आहे. त्यासाठीची मुदत लक्षात घेता या आठवड्यात ते पाडले जाईल. ते पाडण्याआधी त्याची माती कोठे टाकणार, याची परवानगी कदम यांना पर्यावरण विभागाकडून घ्यावी लागेल, असेही सोमय्या यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.