Konkan News
Konkan Newsesakal

Konkan News : नानाचं औषध : जालीम पण नाजूक

लग्नाच्या (Marriage) बाजारात ठाम उभं राहाता येईल, असं नानाकडे व्यक्तिमत्त्व सोडलं तर काहीच नव्हतं.
Published on

राजा बर्वे, चिपळूण

वरकरणी नानाचे उत्तम चालले असले तरी चाळिशी उलटली आणि नाना बदलत गेला. दरम्यान, विसूभाऊ आणि मालूताई दोघेही पाठोपाठ गेले आणि नाना एकटा पडला. न भागलेल्या शारीरिक गरजांची भूक उद्रेकाचं रूप घेऊन बाहेर येऊ लागली आणि नानाला अधूनमधून फिट्स यायला लागल्या. नाना हळूहळू तडे गेलेल्या भिंतीसारखा खचत चालला हे कळत होतं...

Konkan News
कोकणात सायकलस्वार पर्यटक; टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्टस, जॅकेट्सनी सायकलिंगला आणला ग्लॅमरस लूक

तुम्ही जर कोकणात नवखे असाल तर तुम्हाला अनेक गोष्टी इथे मुळापासून नवीन बघायला, अनुभवायला मिळतील. गेल्या दहा वर्षांत कोकणात जाणवण्याइतपत फरक पडला असला तरी हा फरक मुंबई-गोवा हायवे (Mumbai-Goa Highway) ज्या कूर्मगतीने सुरू आहे इतक्याच मंदगतीने होतोय. रत्नागिरी (Ratnagiri), चिपळूण, कणकवली आणि सावंतवाडी अशा मोजक्या शहरांनी थोडं बाळसे घेतले आहे. अजूनही बाकीचे कोकण तसेच संथ, सुस्त आणि शांतपणाने आपला रोजचा दिनक्रम सरकवत आहे. सह्याद्री ते सागर या पट्ट्यातही माणसांचे वेगवेगळे लेअर्स पाहायला मिळतात. सह्याद्रीकडची पूर्वेकडची गावे जराशी रुक्ष, वाळलेली तर समुद्रकाठच्या गावात जरा अधिक हिरवळ. माणसांचे स्वभावदेखील असेच पूर्वेकडचे रूक्ष तर खाडीपट्टा जरा अधिक हौशी.

कोकणातले जास्तीत जास्त अर्क मला इथेच सापडले. नानासुद्धा इथलाच. नारळाला कोंब फुटावा, सुपारीच्या पोफळातून अंकुर रुजून दक्षिण दिशा धरून रोप वर यावे इतक्याच सहजपणे नानाचा जन्म झाला. मालूताईच्या सहाव्या अपत्यानंतर जन्माला आलेला नाना. मालूताईला खरंतर मुलं नकोशी झालेली; परंतु तेव्हा संतती नियमनाची कोणतीच साधने नव्हती म्हणून मग नानाचा जन्म आगंतूक. म्हणून मालूताई वसंताला नाना म्हणे. पुढे तो सगळ्या गावाचा नाना झाला. वडिलांची भिक्षुकी आणि थोडी बाग या जीवावर संसार रेटणे विसूभाऊंना अशक्य होत होते. काही मुले कोणाकोणाच्या आधाराने मुंबई, कोल्हापूर आणि पुण्याकडे पांगली आणि चार मुलींना लवकर उजवून विसूभाऊंनी अन्नाला आणि संसाराला लावून दिले. नाना शेंडेफळ म्हणून घरी कोणीतरी असावं म्हणून नाना घरीच राहिलेला.

Konkan News
Frozen Shoulder Symptoms : फ्रोझन शोल्डरपासून मिळवा मुक्ती, फिजिओथेरपीमुळे पुनश्‍च येई शक्ती।

मुळात नाना हुशार; पण शिक्षणात ना नानाला गोडी होती ना विसूभाऊंना. नानाचे वैदिक शिक्षणसुद्धा यथातथाच. विसूभाऊ थकले आणि नानाने बाग आणि भिक्षुकी ताब्यात घेतली. लग्नाचं वय उलटून जायला लागले आणि खेडेगावात मुली यायला तयार होईनात. लग्नाच्या (Marriage) बाजारात ठाम उभं राहाता येईल, असं नानाकडे व्यक्तिमत्त्व सोडलं तर काहीच नव्हतं. कर्नाटकातील विवाह ठरवणारा एक एजंट देवरूखात होता. तिथे विसूभाऊ दोन-चारवेळा खेटे घालून आले; पण नानाला मुलगी काही मिळेना. अखेर चाळिशी पार झाली आणि नानासकट सगळ्यांनीच नानाच्या लग्नाचा नाद सोडून दिला.

नाना मुळात जसा मिश्कील होता तसाच देखणादेखील होता. साडेपाच फुटांवर उंची, तरतरीत नाक, गणपतीसारखे रूंद आणि आत निमुळते होत आलेले कान, हिरवट घारे डोळे, पान खाल्ल्याने कायम लालचुटुक झालेल्या ओठांची अरूंद जिवणी, डावा खांदा मधून मधून उडवत बोलायची सवय. त्यामुळे दोन-तीन गावांत भटजी म्हणून नाना लोकप्रिय. मंत्र माहीत नसले तरी नानाला तंत्र मात्र उत्तम अवगत होते. त्यामुळे लोक नानालाच आग्रहाने बोलावत.

Konkan News
Black Panther : कोकणात काळ्या बिबट्याचा मुक्त वावर; राजापूर, गुहागरात आढळला 'ब्लॅक पँथर'

एक दिवस नानाकडे गेलो. नानाने घरीच छोटंसं गोळ्या बिस्किटांचे दुकान सुरू केले होते. ‘नाना, तब्येत खालावली आहे तुझी, एकदा चांगल्या डॉक्टरला दाखव’. त्यावर नाना बरगड्यांवर वरून खाली हात फिरवत मला म्हणाला, “राजाभाऊ, डॉक्टर अगदी अमेरिकेतला आला तरी माझ्या रोगावर त्याच्याकडे औषध नाही हो. काय झालंय ते मला कळतंय, नानाचे अजब शरीरशास्त्र ऐकून मी थोडा दचकलोच; परंतु त्याचबरोबर एका हळूहळू भेसूर आणि अक्राळविक्राळ होत जाणाऱ्या सामाजिक प्रश्नाची नानाने नकळत जाणीव करून दिली होती.

मधल्या काही वर्षात माझी बदली झाल्याने नानाशी संपर्क तुटला होता. नाना अधिकाधिक ढासळत गेला. नानाची हळूहळू लोकांना भीती बसली. इतकं नानाचे वागणे चमत्कारिक व्हायला लागले. नाना कधीही रात्री-बेरात्री कधी तोकड्या कपड्यात तर कधी दिगंबर अवस्थेत फिरायला लागला. डावा खांदा मध्येच उडवत, “साले कसे झोपलेत बघा आपापल्या घेऊन, बापाला जमलं नाही, कोण देणार मला बायको? अरे तुमच्या मुली तुम्ही शहरात देणार आणि तुमच्या मुलांसाठी खेड्यात कोण येणार रे मग?”.. हे म्हणजे, आपली पोरं इंग्रजी माध्यमात घालायची आणि मराठी शाळा सुरू राहायला हव्यात असं गावभर बोंबलत फिरायचं अशापैकी प्रकार.” पण मुळात नाना यातून एका मोठ्या सामाजिक प्रश्नाला मात्र चव्हाट्यावर आणत होता.

Konkan News
Learning Disorder Symptoms : शैक्षणिक अक्षमता ही एक मानसिक स्थिती आहे, यासाठी ठराविक उपचार नाहीत; कशी असतात लक्षणे?

एक दिवस माझ्या घराची बेल वाजली. “नाना, अरे तू कसा काय आलास आज अचानक?.. नानाच्या मागे एक चाळिशीतली बाई उभी होती. हातात हिरवा चुडा होता आणि हातभर मेंदी गोंदलेली. मुळात देखणा असलेला नानासुद्धा जरा नीटनेटका दिसत होता. “राजाभाऊ, महिना झाला, धालवलीतल्या भाल्या गोणबरेची ही शकू. गालावर जन्मखुणेचा काळा मोठा चट्टा घेऊन जन्माला आली. लग्न जमेना. हिला पण फिट्स येतात अधुनमधून. मग एक दिवस भाल्या माझ्याकडे आला आणि म्हणाला, “भाऊनू तुमी आमचं भट, विचारावा कसा असा प्रश्न, पर एक ईचारू काय?. शकूला पदरात घ्याल तर तुमचा आनी शकूचा पर कल्याण हुईल. तुमच्या घरालाबी वाईच घरपन येईल. सांगा इचार करून काय ता”. अखेर भाल्या गोणबरेच्या रूपाने नानाला डॉक्टर भेटला होता आणि शकूसुद्धा. नानाने आता वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर परत एकदा परसातली बाग भरायला घेतलीय.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.