Ramdas Bhartav Bodybuilding competition
Ramdas Bhartav Bodybuilding competitionesakal

Bodybuilding Competition : रामदासचं आंतरराष्ट्रीय स्तरावर आता तिरंगा फडकवण्याचं स्वप्न; आजारावर मात करत कमावली शरीरयष्टी

मधुमेहासह अन्य आजारांवर मात करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी व्यायाम सुरू केला होता.
Published on
Summary

राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू कुणाल सातवे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथील एसके फिटनेस या व्यायामशाळेमध्ये रामदास घाम गाळत आहेत.

राजापूर : वयाच्या चोवीसाव्या वर्षापासून असलेल्या मधुमेहासह अन्य आजारांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक सुदृढता (Physical Fitness) मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी व्यायामाची कास धरली. पिळदार शरीरयष्टी कमावून आजारांवर मात केली. अकाउटंट आणि टॅक्स कन्सल्टन्सी (Accountant and Tax Consultancy) हा स्वतःचा व्यवसाय सांभाळताना पदकांची कमाईही केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवण्याचे स्वप्न एमकॉम आयसीडब्ल्यूए असे उच्चशिक्षित असलेल्या ३९ वर्षीय तालुक्यातील ओशिवळेचे सुपुत्र रामदास भरताव यांनी उराशी बाळगले आहे. राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेतील (Bodybuilding competition) लक्षवेधी कामगिरीच्या जोरावर त्यांची ‘मिस्टर वर्ल्ड, मिस्टर आशिया आणि मिस्टर साऊथ आशिया’या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ५५ किलो वजनी गटातील राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघातून निवड झाली आहे. पुढील महिन्यामध्ये चेन्नई येथे ही स्पर्धा होणार आहे.

Ramdas Bhartav Bodybuilding competition
Children Health Tips : मुलांमध्ये झोपेच्या समस्या; वेळीच काळजी घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

या स्पर्धेमध्ये यश संपादन करत अनेक वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न साकारण्यासाठी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू कुणाल सातवे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथील एसके फिटनेस या व्यायामशाळेमध्ये रामदास घाम गाळत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील रामदास यांचे ओशिवळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक तर पाचल येथील किसान छात्रालयामध्ये राहून सरस्वती विद्यामंदिरमधून माध्यमिक शिक्षण झाले आहे.

पुढे त्यांनी मुंबई गाठताना दिवसा नोकरी आणि रात्री शिक्षण घेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. चोविसाव्या वर्षी मधुमेहाचे निदान झाले. त्यानंतर मेंदूमध्ये छोटीशी गाठही असल्याचे स्पष्ट झाले. या साऱ्या आजारांवर मात करण्यासाठी व्यायाम सुरू केला. त्याच्या जोरावर गेली दोन वर्ष शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभागी होत तब्बल ६७ पदकांची कमाई केली.

Ramdas Bhartav Bodybuilding competition
Konkan Birds : बुलबुलने दिला एकाच घरट्यात दोनदा पिलांना जन्म; उन्हाच्या कडाक्यात फुलवला संसार

मधुमेहासह अन्य आजारांवर मात करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी व्यायाम सुरू केला होता. शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे स्वप्न नव्हते; मात्र राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू कुणाल सातवे यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले. या प्रवासात वडील मनोहर, आई मनीषा, मामा अनिल भोवड, शांताराम भोवड, पत्नी तृप्ती या सर्वांचे मिळणारे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले आहे.

- रामदास भरताव, राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.