खेड ः माकडांना पळवते कॅल्शियम कार्बाईड बंदुक

खेड ः माकडांना पळवते कॅल्शियम कार्बाईड बंदुक

Published on

rat20p8.jpg
78683
खेडः येथील बाजापेठेत रस्त्याच्या बाजूला कॅल्शियम कार्बाईड बंदुक विक्रीसाठी घेऊन आलेले विक्रेते.

माकडांना पळवते कॅल्शियम कार्बाईड बंदूक
रत्नागिरीत मोठ्याप्रमाणात रस्तोरस्ती विक्री; धोक्यांकडे होतेय दुर्लक्ष
खेड, ता. २० : गेल्या काही वर्षापासून कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये माकडांचा बागा व नागरी वस्त्यांमधील उपद्रव वाढला आहे. जंगलतोडीमुळे अधिवास उद्ध्वस्त झालेली माकडे अन्नाच्या शोधात गावात व फळबागांमध्ये शिरतात. त्यांचा उपद्रव जास्त वाढू लागल्याने कॅल्शियम कार्बाईडची बंदूक मोठ्या प्रमाणात विकली जाऊ लागली आहे. पाण्याशी संपर्कात आल्यावर हवेशी संपर्कात आल्यावर पेट घेणारा ज्वालाग्रही वायू उत्पन्न करणाऱ्या व स्फोट घडवणाऱ्या या बंदुका रस्तोरस्ती विकल्या जात आहेत.
कोकणात माकड बागांमध्ये येऊन आंबा, नारळ, चिकू, केळी, काजू, शेवगा, सुपारी यांचे नुकसान करत आहेत. त्यांचा उपद्रव टाळण्‍यासाठी त्यांना इजा न पोहोचवता पळवून लावण्यासाठी शेतकरी विविध मार्ग सध्या शोधत आहेत. माकडांना पळवून लावण्यासाठी फटाक्यासारखा आवाज करणारी एक बंदूक वेगाने लोकप्रिय होत आहे. हे यंत्र पाईपपासून तयार केले आहे. या यंत्राची सध्या रत्नागिरी जिल्ह्यात धडाक्यात विक्री सुरू आहे. मोठे आवाज झाले तर ही उपद्रवी माकडे पळून जातात, हे लक्षात घेऊन प्‍लास्‍टिकच्‍या पाईपपासून बनवलेली पिचकारीसारखी छोटेखानी बंदूक बाजारात उपलब्ध झाली आहे. शेतकरीदेखील त्याला पसंती दर्शवत आहेत. बाजारात ही बंदूक अवघ्‍या २०० रुपयाला विकली जात आहे.
--------------------
चौकट
अशी असते बंदुक
प्‍लास्‍टिकच्‍या पाइपचा छोटा तुकडा दोन्‍ही बाजूने बंदिस्‍त केलेला असतो. पाइपवर एक छिद्र पाडून त्‍यातून कॅल्शियम कार्बाईडचे तुकडे टाकले जातात. त्‍यात थोडं पाणी ओतून झाकण बंद केले जाते. हा पाइप हलवला की, त्‍यात अँसिटिलिन गॅस तयार होतो. या गॅसवर पाईपच्‍या एका बाजूने असलेल्‍या गॅस लायटरमधून ठिणगी पेटवली जाते. गॅस बाहेर पडत असताना तो पेट घेऊन स्फोट होतो व फटाक्‍यासारखा मोठा आवाज होतो. या आवाजाने माकडे घाबरून पळून जातात.

चौकट
साठ्याबाबत नवीन नियमावली
या बंदुकीतून वापरासाठी कॅल्शियम कार्बाईड आणायचे कुठून, हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांना पडण्याची शक्यता आहे. सन २०२३ मध्ये कॅल्शियम कार्बाईड साठा व वापराबाबत सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे तसेच या बंदुकीची आवश्यकता व उपयुक्तता पाहता सरकारच्या संबंधित यंत्रणेने त्याच्या सुरक्षा चाचण्या करून योग्य सुधारणादेखील सुचवणे अपेक्षित आहे. कॅल्शियम कार्बाईडचा पाणी व हवा यांच्याशी होणारा संयोग धोकादायक स्फोट घडवू शकत असल्याने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.