मद्य विक्री प्रकरणी डोळसवाडीतील महिला ताब्यात

मद्य विक्री प्रकरणी डोळसवाडीतील महिला ताब्यात

Published on

४१ (पान ३ साठी)

मद्य विक्री प्रकरणी महिला ताब्यात

लांजा, ता. २४ ः विनापरवाना देशी-विदेशी मद्य विक्री प्रकरणी एका महिलेला लांजा पोलिसांनी वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथून ताब्यात घेतले असून घटनस्थळावरून ३ हजार ४४५ रुपयांचा मद्याचा साठाही जप्त केला आहे.
वेरवली बुद्रुक डोळसवाडी या ठिकाणी एक महिला देशी विदेशी मद्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकला. संबधित महिलेला ताब्यात घेऊन ५५० रुपयांची पाच लिटरची गावठी हातभट्टीची दारूसह एकूण ३ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास पोलीस बी. एस. रेवणे हे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.