Nandivase Village Chiplun
Nandivase Village Chiplunesakal

Konkan News : कोकणात 'या' प्रदेशाला केरळींचे ग्रहण

भैरवनाथ फार पूर्वीपासून नवसाला पावतो, असे भाविक मानतात; पण नवस पूर्ण झाल्यावर एक घंटा दान करायची प्रथा आहे.
Published on
Summary

चिपळूणपासून २० किमीवर नांदिवसे गाव आहे. तेथून आत जंगलात (Forest) आता रोड झालाय; पण सह्याद्रीचा गर्भ म्हणता येईल, अशा भागात हे स्थान दडलेले आहे.

-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com

सह्याद्रीच्या गर्भात एक गाव आहे. नांदिवसे, चहुबाजूंनी सह्याद्री आणि याच नांदिवसे गावात (Nandivase Village Chiplun) गूढ जंगलात आत घुसले की आहे ग्रामदैवत भैरवनाथाचे स्थान. या देवस्थानाची आख्यायिका सातशे-आठशे वर्षे आपल्याला मागे नेते. एक पुजारीण होती तिला पूर्ण सह्याद्री पर्वत ओलांडून भैरवनाथाची पूजा करायला जायला लागायचे नंतर ती वृद्ध झाली. मग तिने गाऱ्हाणे घातले की, बाबारे माझ्याच्याने आता होत नाही. तेव्हा तूच खाली ये. भैरवानाथाने (Bhairavnath) दृष्टांत दिला, तू चालत राहा. मागे मागे मी येतो. मागे वळून पाहायचे नाही. जिथे थांबशील तिथे मी राहीन. ती चालत राहिली. मागे आपोआप ढोलताशे वाजल्याचे आवाज येऊ लागले. तिची उत्सुकता ताणली गेली आणि मागे वळून पाहिले. तिथेच मग भैरवनाथ स्थानापन्न झाले.

चिपळूणपासून २० किमीवर नांदिवसे गाव आहे. तेथून आत जंगलात (Forest) आता रोड झालाय; पण सह्याद्रीचा गर्भ म्हणता येईल, अशा भागात हे स्थान दडलेले आहे. चहुबाजूंनी जंगल, उभे कडे आणि वैतरणा नदी. पावसात तुफान वादळी नदी असते. कारण सह्याद्री इथेच ढगांना अडवत असतो आणि पाऊस कोसळत असतो. या नदीकाठी हे स्थान, ज्याला निसर्गाचा जवळून अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही पर्वणी. तुमच्या नकळत कितीतरी प्राण्यांनी तुमचे निरीक्षण करून रिपोर्ट पोहोचलेला असतो. या नदीच्या प्रवाहाचा वेग एवढा आहे की, तिथे दगड कोरले गेले आहेत आणि पाऊस कमी झाला की, कोरीव काम पाहायला मिळते.

Nandivase Village Chiplun
खाडीत लालभडक उगवता सूर्य, मगरीने भरलेले जगबुडीचे खोरे अन् बरंच काही; मालदोलीत असं नेमकं आहे तरी काय?

भैरवनाथ फार पूर्वीपासून नवसाला पावतो, असे भाविक मानतात; पण नवस पूर्ण झाल्यावर एक घंटा दान करायची प्रथा आहे. त्यामुळे इथे असंख्य घंटा टांगलेल्या पाहायला मिळतात. घनदाट जंगलात राहायचे असेल, येथे रात्री मुक्काम करायचा असेल तर भा़ंडी ठेवलेली असतात. जबरदस्त थरारक अनुभव इथे रात्र काढताना येतो. विविध प्राणी विविध आवाजाद्वारे आपल्या एरियात का आलात, असे विचारत असतात आणि हालचाली जाणवत असतात. आपण खिचडीवगैरे शिजवलेली असते‌. भन्नाट गारवा असतो. समोर भैरवनाथ आणि सस्पेन्स अनुभव असा योग आणि आपण रात्रभर जागलेली. गावकऱ्‍यांनी.. तिथे मोठी शेड बांधली आहे... एकदम.. स्वतःशी संवाद साधता येईल असे ठिकाण.

Nandivase Village Chiplun
कृष्णाची जीवनगीता! 'मुंबादेवीने ती पोर माझ्या संगती पाठवली नसती, तर मी आज बी मुंबईतच असतो'

एक दिवसाचा वर्कशॉप घ्यायचा असेल तर यासाठी मस्त ठिकाण आहे. विविध अनुभव येतात. समोर स्वयंदेव गावातून पण इथे येता येते; पण वाटाड्या आवश्यक नाहीतर वाट चुकू शकते. आपले दुर्दैव म्हणजे.. संपूर्ण.. औषधी वनस्पतीने भरलेला हा प्रदेश... केरळी लोकांनी नाममात्र किंमतीत विकत घेतला आहे. त्या लोकांनी काय केले? तर प्रथम इथली पूर्ण जैविक साखळी, जी औषधी वनस्पती व वृक्ष यांनी भरलेली आहे ती सफाचट केली. या भागातील वातावरण रबर लागवडीसाठी अत्यंत योग्य असल्याने तेथे एकराच्या एकरात रबर लावत सुटलेत.

Nandivase Village Chiplun
Konkan News : दौलतदादाच्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटलं आणि नकळत डोळे पाणावले!

अजून काही वर्षांनी पूर्ण निसर्गसाखळी उद्ध्वस्त असेल आणि वाघ माणसे खातो, अशी आवई उठवून वाघांना मारले जाईल. आपण दळभद्री पर्यावरणधोरणे असलेल्या देशात राहतो. या भागातील तरुण पिढीला विनंती आहे, हे थांबवा आता. कारण, हे पाहायला भारतातून लाखो रुपये खर्च करून भारतीय परदेशात जातात आणि... आपण.. असलेलं नष्ट करत सुटलोय.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.