Fake Currency Notes
Fake Currency Notesesakal

Fake Currency Notes : सावधान! 500, 100 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने व्यापारी हवालदिल; रॅकेट असण्याची भीती

सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाल्याने मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणांहून अनेक चाकरमानी गावी येत आहेत.
Published on
Summary

घटना ताजी असतानाच आता १०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

खेड : खेडमध्ये ५०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा सापडू लागल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. गर्दीचे ठिकाण गाठून बनावट नोटा चलनात (Fake Currency Notes) आणण्याचा प्रकार सुरू आहे. यामागे एखादं रॅकेट तर नाही ना? अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.

Fake Currency Notes
Satara Lok Sabha : 'मोदींची लाट सुनामीसारखी, लाटेत शरद पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होणार'; बावनकुळेंना विश्वास

सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाल्याने मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणांहून अनेक चाकरमानी गावी येत आहेत. सध्या खेडमध्ये रेल्वे, बस आणि खासगी गाड्यांनी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे शहरातील बाजारपेठेला (Khed Market) सुगीचे दिवस येण्याची चिन्हे निर्माण झालेली असतानाच बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे व्यापारी धास्तावले आहेत. दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील भरणेनाका येथील गजबजलेल्या पेट्रोलपंपावर ५०० रुपयांच्या ३ बनावट नोटा सापडल्या होत्या.

पेट्रोलपंपावर असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आता १०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. शंभर रुपयांची कलर झेरॉक्स असलेली नोट आणि अन्य एका नोटेवर तार नसल्याने या दोन्ही नोटा बनावट असल्याचे लक्षात आले.

Fake Currency Notes
Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात मोदींच्या सभेला तुफान प्रतिसाद; गर्दीचे रूपांतर मतांत करताना नेत्यांचा लागणार कस

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर ५०० रुपयांच्या नोटांचा वापर चलनात मोठ्या प्रमाणात होत असल्याने ५०० च्या अनेक बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याचे चित्र असताना आता १०० रुपयांच्या बनावट नोटा सापडू लागल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.

Fake Currency Notes
तपोवनवर घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; रखरखत्या उन्हातही उत्साह, आजी-माजी आमदारांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

लवकरच छडा लावा

बनावट नोटा चलनात आणण्यामागे मोठे रॅकेट असण्याची भीती व्यापाऱ्यातून व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याचा सखोल तपास करून लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद करा अशी अपेक्षाही व्यापाऱ्यांच्यातून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.